प्रधानमंत्री पिक विमा योजना सुधारित योजनेची वैशिष्ट्ये Pradhan Mantri Fasal Bima Yojana(Pik Vima):

Government schemes:– प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०१६ पासून राज्यात राबविण्यात येत आहे. सदरची योजना खरीप हंगाम २०२५ व रब्बी हंगाम २०२५ – २६ हंगामासाठी एक वर्षांकरिता राज्यात Cup and Cap Model (८०:११०) नुसार राबविण्यात येत आहे.
कृषी व पदुम विभाग, शासन निर्णया अन्वये सुधारीत पीक विमा योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली असून खरीप हंगाम सन २०२५ पासून शेतकऱ्यांना भरावयाचा विमा हप्ता हा खरीप हंगामासाठी विमा संरक्षित रक्कमेच्या २ टक्के, रब्बी हंगामासाठी १.५ टक्के व नगदी पिकांसाठी ५ टक्के भरुन पीक विमा योजनेचा लाभ घेता येईल. PMFBY पोर्टल https:// pmfby.gov.in वर स्वत: शेतकरी यांना तसेच बँक, विमा कंपनी प्रतिनिधी व सामुहिक सेवा केंद्र Pik vima CSC Login यांचे मार्फत योजनेतील सहभागाची नोंदणी करता येणार आहे.

प्रधानमंत्री पिक विमा योजना Pik vima 2025 maharashtra

  • प्रधानमंत्री पीक विमा योजनेची खरीप २०२५ पासून सुधारित निकषांनुसार ८०:११० कप अँड कॅप मॉडेल नुसार राबविण्यात येईल.
  • सदरची योजना ही या आदेशान्वये अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील केवळ अधिसूचित पिकांसाठी असेल.
  • प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे
  • अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी खातेदारांचे व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. मात्र भाडेपट्टीने शेती करणारास नोंदणीकृत (रजिस्टर्ड) भाडेकरार पिक विमा संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक आहे. ५. अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांचे उंबरठा उत्पादन हे मागील ७ वर्षांपैकी सर्वाधिक उत्पादनाच्या ५ वर्षांचे सरासरी उत्पादन गुणीले त्या पिकाचा जोखिमस्तर विचारात घेवून निश्चित केले जाईल. उंबरठा उत्पादन हे एक वर्ष कालावधीकरीता निश्चित असेल तसेच विमा कंपनीने सादर केलेला विमा हप्ता दरही या एक वर्ष कालावधी करीता कायम असेल.
  • सदरची योजना ही एकूण १२ जिल्हा समुहासाठी निवडलेल्या पीक
  • विमा कंपन्यांमार्फत तीन वर्षाकरिता राबविण्यात येईल. विमा कंपन्या एका वर्षामध्ये जिल्हा समूहामध्ये एकूण जमा विमा हप्ता रक्कमेच्या ११० टक्के पर्यंतचे दायित्व स्विकारतील. तथापि, एका वर्षातील देय पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम जमा विमा हप्ता रकमेच्या ११० टक्के.पेक्षा जास्त असल्यास ११० टक्के पेक्षा जास्तीचा भार राज्य शासन स्विकारेल आणि जर देय पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम जिल्हा समूहामध्ये एकूण जमा विमा हप्ता रकमेपेक्षा कमी असेल तर विमा कंपनी विमा हप्ता रक्कमेच्या जास्तीत जास्त २० टक्के रक्कम स्वतः कडे ठेवेल व उर्वरीत विमा हप्ता रक्कम राज्यशासनाला परत करेल.
  • पीक विमा योजनेची अंमलबजावणी केवळ पीक कापणी प्रयोगावर (CCEs) आधारित राबविणेत येईल.
    • समाविष्ट पिके : (१४ पिके) (खरीप हंगाम ) भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग, सोयाबीन, तीळ, कारळे, कापूस व कांदा.
    • समाविष्ट पिके : (०६ पिके ) ( रब्बी हंगाम) : उन्हाळी भात, गहू (बागायत), रब्बी ज्वारी (बागायत व जिरायत), हरभरा, उन्हाळी भुईमूग, रब्बी कांदा. विमा हप्ता व अनुदान शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता हा खरीप हंगामासाठी विमा संरक्षित रकमेच्या २ टक्के, रब्बी हंगामासाठी १.५ टक्के व नगदी पिकांसाठी ५ टक्के असा किंवा वास्तवदर्शी दर यापैकी जो कमी असेल तो राहील. केंद्र शासनाच्या सुधारित मार्गदर्शक सुचनेनूसार केंद्र शासन कोरडवाहू जिल्ह्यातील पिकांना ३० टक्के व बागायती जिल्ह्यातील पिकांना २५ टक्केच्या मर्यादेत त्यांचा समप्रमाणातील हिस्सा अदा करणार आहे. १० सन २०२३ पासून राबविण्यात आलेले १/- रुपयात पीक विमा योजना बंद करण्यात आलेली असून खरीप २०२५ व रब्बी २०२५- २६ मध्ये खालील ४ (Add On) जोखमीच्या बाबी बंद करण्यात आल्या आहे.
    • प्रतिकूल हवामान घटकांमुळे पेरणी/ लावणी / उगवण न होणे.. (Prevented sowing).
    • हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत पिकाचे होणारे नुकसान (Mid Season Adversity).
    • काढणी पश्चात नुकसान (Post Harvest Losses).
    • स्थानिक नैसर्गिक आपत्ती (calamity).
  • सदर योजनेअंतर्गत खरीप हंगाम २०२५ ते रब्बी हंगाम २०२५ – २६ याएक वर्षाकरीता सर्व अधिसूचित पिकांसाठी जोखिमस्तर ७० टक्के असा निश्चित करण्यात आला आहे.
  • प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई निश्चितीसाठीपिकाचे सरासरी उत्पादन काढताना YESH- Tech प्रकल्पामार्फत तंत्रज्ञान आधारित प्राप्त उत्पादनास ५० टक्के भारांकन व पीक कापणी प्रयोगाद्वारे प्राप्त उत्पादनास ५० टक्के भारांकन देऊन खरीप हंगामात भात, सोयाबीन, कापूस व रब्बी हंगामात गहू पिकांचे सरासरी उत्पादन निश्चित करून व अन्य पिकांकरीता पीक कापणी प्रयोगाद्वारे सरासरी उत्पादन निश्चित करून त्यानुसार नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.
  • सदर योजनेसाठी केंद्र शासन निर्देशाप्रमाणे ESCROW बँक खाते उघडून त्यामध्ये राज्य हिश्श्याच्या विमा हप्त्यापैकी ५० टक्के अग्रिम रक्कम खरीप २०२५ हंगामाकरिता विमा नोंदणी सुरु करण्याच्या ३ दिवसापूर्वी जमा करण्यात येणार आहे. 
  • सदर योजनेमध्ये सहभागासाठी ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत शेतकरीओळखपत्र क्रमांक (AGRISTACK Farmer ID) असणे बंधनकारक केले आहे.
  • पीक विमा नुकसान भरपाई साठी ई – पीक पाहणीअंतर्गत पिकांची नोंद करणे बंधनकारक राहील. विमा योजनेत विमा घेतलेले पीक व ई-पीक पाहणीमध्ये नोंदविलेले पीक यामध्ये तफावतीचा मुद्दा उद्भवल्यास ई- पीक पाहणीमध्ये नोंदविलेले पीक अंतिम गृहीत धरण्यात येईल. तसेच ई-पीक पाहणी व प्रत्यक्ष पेरलेले पीक यामध्ये विसंगती आढळून आल्यास विमा अर्ज मंजुरी ते नुकसान भरपाई वाटप या दरम्यान कोणत्याही टप्प्यावर सदर विमा अर्ज रद्द करण्यात येईल.
प्रधानमंत्री पिक विमा योजना सुधारित योजनेची वैशिष्ट्ये Pradhan Mantri Fasal Bima Yojana(Pik Vima):

पिक विमा भरणा Vima Chart 2025:-

अनु .क्रपिकाचे नाव भरणा (प्रती हेक्टर)विमा रक्कम
तूर ७४४.३६ ३७२१७
मुग ७० २८०००
कांदा ५८० ६८०००
मका ५४० ३६०००
बाजरी ७६ .३५ ३०५३८
उडीद५०० २५०००

Pmfby Pik vima status check:

PMFBY स्थिती २०२५ तपासण्यासाठी अधिकृत वेबसाइट वर शेतकऱ्यांना अगदी सोप्या पद्धतीमध्ये आपल्या मोबाईलच्या माध्यमातून पाहता येते ,आणि हीच माहिती मोबाईलवर कशी पाहायची याच्या संदर्भातली सविस्तर अशी माहिती आपण या पोस्ट माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत,

आपल्याला पिक विम्याच्या ऑफिशियल वेबसाईट वरती यायचं आहे त्यासाठी तुमच्या मोबाईलच्या ब्राउजर मध्ये pmfby.gov.in असं टाईप करून सर्च करायचं आहे

फार्मर कॉर्नर या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर पुढील इंटरफेस तुमच्यासमोर येईल लगेच लॉगिन विथ युअर मोबाईल नंबर म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरच्या माध्यमातून लॉगिन करता येणार आहे.

लक्षात ठेवा तुम्ही पीक विमा भरताना जो मोबाईल नंबर रजिस्टर केलेला आहे तोच मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे .आता मित्रांनो तुम्ही खरीप हंगामाच्या पीक विम्याची माहिती पाहणार आहात आणि खरीप हंगामासाठी तुम्ही एक मोबाईल नंबर दिलेला आहे पण रब्बी हंगामाचा पीक विमा भरतानी जर तुम्ही वेगळा मोबाईल नंबर दिलेला असेल तर रब्बी हंगामाच्या पीक विमासाठी जो मोबाईल नंबर दिलेला आहे तोच मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. तुमच्या खरीप हंगामाच्या पॉलिसी सोबत रजिस्टर असलेला आपल्या मोबाईल नंबर वरती एक ओटीपी पाठवला जाईल आणि तो ओटीपी तुम्हाला या ठिकाणी फील करायचा आहे.

मित्रांनो तुमच्या मोबाईल नंबर वरती आलेला ओटीपी या ठिकाणी फील करून घेतल्याच्या नंतर मित्रांनो जर तुमचा एक मोबाईल नंबर वेगवेगळ्या पॉलिसी सोबत लिंक असेल म्हणजेच तुमच्या घरातील दुसऱ्या खातेदाराच्या पीक विमा पॉलिसी सोबत तुमचा एकच मोबाईल नंबर लिंक केलेला असेल तर तुम्हाला ज्या शेतकऱ्याची विमा पॉलिसी स्टेटस चेक करायचा आहे त्या शेतकऱ्याचा आधार नंबर सुद्धा या ठिकाणी टाकावा लागेल आणि आधार नंबर टाकल्याच्या नंतर या ठिकाणी

पद्धतीने ओटीपी येईल आता मित्रांनो आलेला ओटीपी अशा पद्धतीने फील करून घेतल्याच्या नंतर या ठिकाणी सबमिट बटन वरती क्लिक करा सबमिट बटन वरती क्लिक केल्याच्या नंतर अशा पद्धतीने तुमच्या समोर संपूर्ण तुमच्या पॉलिसीचे डिटेल्स येतील मित्रांनो या संपूर्ण पॉलिसीच्या डिटेल्स मध्ये तुमचं नाव तुमचा आधार नंबर तुमचा मोबाईल नंबर तुमचा फार्मर आयडी तुमचा पूर्ण ऍड्रेस संपूर्ण माहिती या ठिकाणी दिसून येईल आता मित्रांनो या ठिकाणी पहा प्रिव्यूज पॉलिसी डिटेल्स पॉलिसी डिटेल्स मध्ये इयर पहा आणि सीजन हे या ठिकाणी सिलेक्टकरून माहिती पहा .