राशन कार्ड KYC: अंतिम मुदत आणि प्रक्रिया माहिती

राशन कार्ड KYC Date करण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2025 आहे.

तुम्ही तुमच्या Ration card ekyc करायचे आहे, घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील तर तेवढ्या सर्व सदस्यांची ची केवायसी करायची आहे .म्हणजेच तुम्हाला रेशन दुकानामध्ये जायचं आहे ,किवा शासन अधिकृत App Mera e-kyc App मधून तुमच्या बोटाचा ठसा सुद्धा द्यायचा आहे. तुमच डोळ्यांच स्कॅनिंग सुद्धा करायचा आहे ,त्यानंतर तुमचे केवायसी पूर्ण होईल.

त्यानंतर तुमचं जे आधार कार्ड आहे तर ते आधार कार्ड रेशन कार्ड सोबत लिंक करायचा आहे. कारण तुम्हाला जे पैसे मिळणार आहेत तर हे पैसे आधार कार्डच्या आधारावरती तुमच्या बँकेमध्ये सुद्धा विस्तांतर होणार आहेत बघा जे जे रेशनधारक दोन कामे करतील त्यांनाच याचा लाभ सुद्धा घेता येणार आहे.

राशन कार्ड kyc

रेशन कार्ड kyc कशी करायची?

  • मेरा ई केवायसी सर्च केल्यानंतर हे ॲप्लिकेशन येईल पाहू शकता मेरा ई के वायसी नॅशनल इन्फॉर्मेशन सेंटर गव्हर्मेंटचा आहे ॲप्लिकेशन हेच ॲप्लिकेशन आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे.
  • आधार फेस आरडी हे एक ॲप्लिकेशन आहे हे आपल्याला फक्त इन्स्टॉल करायचंय याला ओपन वगैरे करायचा ऑप्शन येणार नाही फक्त हे ॲप्लिकेशन ओपन करा आणि सोडून द्या.
  • मेरा केवायसी ॲप ओपन झालाय त्यानंतर इथे स्टेट निवडायला तुम्हाला विचारेल तर यामध्ये आपलं महाराष्ट्र स्टेट पहा खाली आहे महाराष्ट्र स्टेट निवडायचा आहे. महाराष्ट्र स्टेट निवडल्यानंतर तुम्हाला खाली व्हेरिफाय लोकेशन च बटन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे.
  • व्हेरिफाय लोकेशन होत नसेल तर तुमच्या मोबाईल मधलं लोकेशन ऑन करून घ्यायचं आहे. असं खाली तुमचा शटर खाली घेतलं की जे लोकेशन आहे ,हे ऑन असणे गरजेचे आहे मोबाईलचे लोकेशन ऑन असेल त्यानंतरच तुम्हाला व्हेरिफाय लोकेशन वरती एकदा दोनदा क्लिक करायचं आहे.
  • क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता पुढे येणार आहात यामध्ये आता आपल्याला आधार नंबर विचारलाय ज्या व्यक्तीची तुम्हाला केवायसी करायची आहे .त्या व्यक्तीचा इथे आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आणि खाली जनरेट ओटीपी वरती क्लिक करायचा आहे.
  • आता आधार नंबर ज्या व्यक्तीचा टाकलेला आहे त्याला जो काही मोबाईल नंबर लिंक आहे .त्या आधार च्या मोबाईल नंबर वरती एक ओटीपी येईल तो ओटीपी इथे सिक्स डिजिटचा टाकून घ्यायचा आहे.
  • खाली कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा आहे तसा इथे एंटर करतोय एंटर करायचा आहे आणि एंटर करून खाली सबमिट बटनावरती क्लिक करायचंय.
  • जसं तुम्ही सबमिट कराल तर इथे पाहू शकता बेनिफिशरी डिटेल्स तुमचं नाव दाखवलं जाईल होम स्टेट महाराष्ट्र दाखवलं जाईल रेशन कार्डचा नंबर दाखवला जाईल तसेच होम डिस्ट्रिक्ट तुम्ही कुठल्या डिस्ट्रिक्ट मधले ते दाखवले जाईल ई केवायसी अप्रूवल तिथे काहीच दाखवलं नाही आधार नंबरचे डिटेल्स दाखवले जाईल.
  • ई केवायसी स्टेटस जर पाहिलं तर पुढे काहीच नाहीये आता आपल्याला केवायसी करायची आहे, केवायसी करण्यासाठी खाली फेस ई केवायसी बटनावरती क्लिक करायचं आहे इथे एक्सेप्ट करायचंय आणि इथे व्हाईल युजिंग द ॲप इथे परमिशन द्यायची आहे आता इथे आपल्याला आधार ऑथेंटिकेशन करायचं आहे.
  • स्टेप्स आहेत त्या ऑटोमॅटिक लोड होतील इथे तुम्हाला काही स्टेप्स दिल्या जातील ज्यामध्ये सांगितलं आहे की तुमचा चेहरा फक्त दाखवायचा आहे तोंड दाखवायचा आहे .आणि डोळे मिचकवायचे आहेत तर इथे एक्सेप्ट करायचं आहे, आणि बॉक्स वरती टिक करून प्रोसिड बटनावरती क्लिक करायचा आहे.
  • ज्या व्यक्तीचा आधार नंबर टाकलाय तो व्यक्ती समोर घेऊन त्या मोबाईल मध्ये अशा पद्धतीने फोटो घ्यायचा आहे .जो की त्या गोल मध्ये आपलं तोंड आणि डोळे असे दिसले पाहिजेत तर व्यवस्थित फोटो घेतला की पाहू शकता ई केवायसी स्टेटस ई केवायसी रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालेली आहे.

राशन कार्ड KYC कशासाठी?

  • रेशनकार्डवर मिळणारे लाभ सुरु ठेवण्यासाठी ई-केवायसी करणे अनिवार्य.
  • फक्त पात्र कुटुंबांनाच अनुदानित अन्नधान्य मिळेल, हे सुनिश्चित करण्यासाठी.

Ration card ekyc Maharashtra ई-केवायसी न केल्यास-

  • लाभार्थ्यांना रेशन मिळू शकणार नाही.
  • रेशनकार्ड निष्क्रिय देखील होऊ शकते.

Ration Card ekyc – हे लक्षात ठेवा

  • ई-केवायसीसाठी लाभार्थ्यांनी आधार कार्ड सादर करणे, बायोमेट्रिक्स करणे आवश्यक.
  • आधारकार्ड रेशनकार्डशी लिंक असेल तरच ई-केवायसी ऑनलाइन पूर्ण करू शकता.
  • इतर कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही.

राशन कार्ड kyc app

आपल्या रेशनकार्डची ई-केवायसी आपण खालीलपैकी दोन प्रकारे करू शकता

1) शासनाचे अधिकृत App Mera e-KYC

2) जवळचे रेशन दुकान

आधारकार्ड रेशनकार्डशी लिंक करण्यासाठी शासनाच्या rcms.mahafood.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर Public Login द्वार अथवा जवळच्या शिधावाटप कार्यालयात जाऊन आधार कार्ड लिंक करू शकता.