फार्मर आयडी कसा काढावा : How to create farmer id in maharashtra(agristack)

सर्व शेतक-यांना सुचित करण्यात येत आहे की, ७/१२ वर जेवढे नाव आहेत. त्या सर्व शेतक-यांनी गावातील नजीकच्या सीएससी केंद्रावर संपर्क करून फार्मर आय डी. तात्काळ काढून घेणेत यावा. किवा self registration करून घेयच आहे. ज्याप्रमाणे सर्व सामान्य व्यक्तीची ओळख म्हणजे आधारकार्ड आहे, त्याचप्रमाणे शेतकरी असल्याची ओळख म्हणजे फार्मर आय.डी. असणार आहे.

फार्मर आयडी महाराष्ट्र
फार्मर आयडी महाराष्ट्र

फार्मर आयडी म्हणजे काय ?

फार्मर आय.डी म्हणजे शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने उपलब्ध करून दिलेले एक ओळखपत्र आहे, जे विविध सरकारी योजना आणि सबसिडी मिळवण्यासाठी उपयोगी पडते. mhfr agristack gov in login या Gov .लिंक वर जाऊन शेतकरी घरी बसून आपले फार्मर आयडी काडू शकतो .

फार्मर आयडी साठी लागणारे कागदपत्रे (Maharashtra Farmer Id Documents):-

  • आधारकार्ड, सर्व ७/१२ किंवा ८अ उतारा,
  • आधारकार्ड सलग्न असलेला मोबाईल नंबर (ओटीपी करीता).

फार्मर आय. डी न काढल्यास होणारे तोटे :

  • पी एम किसान योजनेचा लाभ बंद होईल.
  • नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ बंद होईल.
  • पिक विमा काढता येणार नाही.
  • पिक कर्ज मिळणार नाही.
  • कृषि विषयक सर्व योजना करीता फार्मर आयडी अत्यावश्यक.
  • नैसर्गिक आपत्ती, वादळे, अवकाळी पाऊस, फळ पिक, शेतीपीक नुकसान भरपाई मिळणार नाही.
  • जमीन खरेदी विक्री व्यवहार करता येणार नाही.
  • पीक कर्ज माफी लाभ घेता येणार नाही.
  • शासकीय धान खरेदी केंद्रावर धान (भात) विक्री करता येणार नाही.
  • महसुल विभाग व पंचायत समिती विभाग यांजकडील काही योजनेत फार्मर आय डी आवश्यक आहे. त्याशिवाय योजनेचा लाभ मिळणार नाही.

अशाप्रकारे शासनाच्या सर्व विभागाच्या अनेक लोकाभिमुख योजना लाभाकरीता फार्मर आयडी क्रमप्राप्त / अत्यावश्यक आहे. तरी आपले कोणतेही नुकसान होवु नये म्हणून आजच फार्मर आय. डी. काढून घ्यावा व इतर शेतकरी बांधवांना फार्मर आयडी काढण्यास सांगावे ही विनंती.