7/12 online maharashtra:भूमी अभिलेखची यामध्ये गाव नमुना नंबर, सातबारा ,आठ ,मालमत्ता पत्रक व क पत्रक या प्रकारची माहिती तुम्ही पाहू शकता फक्त ही माहिती तुम्ही कुठे वापरू शकत नाही,फक्त पाहायचं असेल तर इथे पाहू शकता आणि ही सर्व माहिती तुम्ही फ्री मध्ये पाहू शकता तुम्हाला कोणतेही एक रुपया सुद्धा द्यायची गरज नाही.

पाहायचंय त्यावरती क्लिक करायचं आहे .
What is Satbara Utara?
7/12 उतारा (Satbara Utara) म्हणजे जमीन मालकी व जमीनविषयक तपशील दाखवणारा
एक राज्य सरकारद्वारे ठेवला जाणारा महसूल दस्तऐवज आहे.
यात दोन विभाग असतात:
- उतारा (Form 7 ) :जमिनीचा मालक कोण आहे, त्याची नोंद.
- उतारा (Form 12 ) : जमिनीचा वापर कसा होतो, पीक कोणतं आहे इत्यादी माहिती.

सातबारा ऑनलाइन बघणे?
सातबारा पाहायचा आहे तर Mahabhulekh v2.0 या लिंक वर क्लिक करा, सातबारा वरती क्लिक करा जिल्हा निवडा तालुका निवडा तुमचं जे काही गावाचं नाव असेल ते गावाचं नाव निवडा गट नंबर तुम्हाला माहित असेल तर गट नंबर टाका गट नंबर माहित नसेल तर नावाने सुद्धा तुम्ही सर्च करू शकता गट नंबर माहीत असेल तर त्याचा गट नंबर टाकून सर्च करा, सर्च करू शकता मोबाईल नंबर टाकून आपली भाषा मराठी सिलेक्ट करा कॅप्चा आहे तसा टाकून सबमिट करा तुमचा सातबारा इथे तुम्हाला पाहायला भेटेल तसेच आठ सुद्धा आहे आठ सुद्धा तुम्हाला अशाच प्रकारे पाहू शकता .
सातबारा ॲप (Online 7/12 Utara App)
सातबारा उतारा तुम्ही आता तुमच्या मोबाईल मध्ये सुद्धा पाहू शकता त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये अँड्रॉइड ॲप इन्स्टॉल करावे लागेल त्याचे मी लिंक पुढे देत आहे ७/१२, ८ App ते तुम्ही डाऊनलोड करून घ्यावे आणि आपल्या मोबाईलवर सातबारा उतारा व ८ अ इत्यादी घरबसल्या पाहू शकता.
सातबारा उतारा कोण देतो?
सातबारा उतारा स्वतः शेतकरी ऑनलाइन पद्धतीने मोबाईल app मधून किवा Mahabhulekh च्या वेबसाईट वरुन काढू शकतो, किंवा तलाठी ऑफिस मध्ये जाऊन तलाठ्या मार्फत काढू शकतो.