महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळात पद भरती |Mahatma Phule Magasvargiya Vikas Mandal

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित, मुंबई यांच्या आस्थापनेवर पुर्णवेळ नियमित कंपनी सचिव पदासाठी विहीत केलेली अर्हता व पात्रता असलेल्या व्यक्तींकडून अर्ज मागविण्यात येत आहे.इच्छूक अर्जदारांनी दि.०९ जून २०२५ अखेरपर्यंत md@mpbcdc.in येथे अर्ज सादर करावेत.

कंपनी सचिव (Company Secretary) या पदासाठी अर्हता व पात्रता पुढीलप्रमाणे :

  • अर्जदार Institute of Company Secretaries of India ( ICSI) Membership Certificate धारण केलेला असावा.
  • कंपनी सचिव क्षेत्रात किमान ५ वर्षाचा अनुभव अराणे आवश्यक आहे.
  • विधी पदवी धारण केलेली असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
  • मराठी, इंग्रजी व हिंदी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • वयोमर्यादा जास्तीत जास्त ४५ वर्षे इतकी असावी.
  • वेतनश्रेणी एस-२३ वेतन मॅट्रीक्स रू.६७७००-२०८७००.

पात्रता आणि किमान व कमाल वयोमर्यादा:

  • भारतीय नागरीकत्व (महाराष्ट्राचे अधिवासी) आवश्यक आहे.
  • अर्जदार हा शारीरीक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावा तसेच अर्जदाराविरुद्ध कोणतेही फौजदारी गुन्ह्याचे प्रकरण सुरु / प्रलंबित नसावे.
  • अर्ज स्विकृतीच्या शेवटच्या दिनांकास उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ४५ वर्षे इतकी राहील.
  • वरील पदासाठी अटी व शर्ती सोबतच्या परिशिष्ट-अ मध्ये नमूद करण्यात आल्या आहेत.
  • विहित नमुन्यातील अर्ज स्वीकारण्याचा शेवटचा दि.०९/०६/२०२५ रोजी संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत आहे. विहीत तारीख / वेळेनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • कोणतीही कारणे न देता जाहीरातीमधील रिक्त पदाच्या संख्येत बदल करणे, पदभरती स्थगित करणे / रद्द करणे व पदभरती प्रक्रिया याबाबतचे सर्व अधिकार तसेच प्राप्त अर्ज अंशतः किंवा पूर्ण किंवा सर्व अर्ज स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार महामंडळ राखून ठेवत आहे.
  • अर्जासोबत कोणतेही मूळ प्रमाणपत्र जोडण्यात येऊ नयेत. मुळ कागदपत्रे मुलाखतीच्या वेळी तपासणीसाठी सादर करणे अनिवार्य आहे.
  • अर्जासोबत मुळ प्रमाणपत्रांच्या छायांकित प्रती जोडण्यात याव्यात. छायांकित प्रती स्वयंसाक्षांकीत (Self Attested) करण्यात याव्यात.
  • अर्जासोबत जोडलेल्या सर्व कागदपत्रांच्या छायाप्रती स्पष्ट आणि सुवाच्च असाव्यात. अपात्र / अस्पष्ट प्रती किंवा अंशतः दाखल केलेले / सदोष अर्ज सरसकट नाकारले जातील.
  • मुलाखतीसाठी/चाचणीसाठी उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा प्रवास भत्ता / निवास भत्ता इत्यादी अनुज्ञेय असणार नाही.
  • इच्छुक उमेदवारांनी सोबत जोडलेल्या परिशिष्ट-ब नुसार त्यांचे विहीत नमुन्यातील अर्ज, वयाचा दाखला, शैक्षणिक/तांत्रिक पात्रता प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे md@mpbcdc.in वर ई-मेलद्वारे दि.९/०६/२०२५ सायंकाळी ५.३० पर्यंत पाठवावे.

परिशिष्ट-अ : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादीत मुंबई यांच्या मुंबईतील कार्यालयासाठी कंपनी सचिव या पदासाठी अटी व शर्ती:

  • वरील पदावरील नियुक्ती म.फु.मा.वि.म. मर्या., च्या मुंबईतील कार्यालयासाठी आहे.
  • जाहिरातीमध्ये नमुद केलेली शैक्षणिक अर्हता/पात्रता इत्यादी अर्हता किमान असून ती धारण केली म्हणून उमेदवार निवडीस पात्र असणार नाही. अर्ज सादर केलेल्या सर्व पात्र अर्जदारांची अर्हता, उच्य शैक्षणिक अर्हता व अनुभव इत्यादी गुणवत्ता तपासून गुणवत्तेच्या आधारे निवड करण्यात येईल.
  • निवड झालेल्या उमेदवाराचा परिविक्षाधीन कालावधी हा २ वर्ष राहील. परिविक्षाधीन कालावधीतील कामकाज समाधानकारक नसल्यास त्याची नियुक्ती संपुष्टात आणणेत येईल.
  • निवडलेल्या उमेदवाराला महामंडळाचे नियमाप्रमाणे महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वैद्यकीय प्रतिपूर्ती, दूरध्वनी भत्ता इत्यादी भत्ते अनुज्ञेय राहतील.
  • निवडलेल्या अर्जदाराला (पूर्णवेळ) सामान्य कार्यालयीन वेळा पाळणे आवश्यक आहे आणि त्यांना शनिवार, रविवार सुट्टीच्या दिवशी किंवा आवश्यक असल्यास कोणत्याही सुट्टीसह कार्यालयीन वेळेच्या पलीकडे कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगितले जाऊ शकते.
  • निवड झालेल्या अर्जदाराला निवड यादीतील गुणानुक्रमांकाच्या आधारे प्राधान्यक्रमाने पदस्थापना दिली जाईल तसेच याबाबत अर्जदारांनी कुठल्याही दबावतंत्राचा वापर केल्यास सदर अर्जदाराची निवड रद्द करण्यात येईल.
परिशिष्ट-अ
परिशिष्ट-अ