Trump Tariffs यांच्याकडून भारतावर २५ टक्के कर ,भारतावर परिणाम काय होणार ?

Trump Tariffs India अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत भारतावर २५% टॅरिफ (आयात कर) लादण्याची घोषणा केली आहे. यासोबतच, त्यांनी पाकिस्तानसोबत तेल उत्खनन करार फायनल केल्याचेही जाहीर केले.

Tariff Meaning In Marathi :

Tariff म्हणजे सरकारकडून आयात किंवा निर्यातीवर लावण्यात येणारा कर. हा कर प्रामुख्याने देशांतर्गत उद्योगांचे संरक्षण करण्यासाठी आणि विदेशी वस्तूंवर नियंत्रण ठेवण्यासाठी लावला जातो.

US Tariff on india| ट्रम्प यांच्या धोरणांची ठळक वैशिष्ट्ये:

  • “अमेरिका फर्स्ट 2.0” धोरण अधिक आक्रमकपणे राबवले जात आहे.
  • रशियासोबत व्यवहार करणाऱ्या देशांवर सेकंडरी सॅंक्शन्स (दुय्यम निर्बंध) लादण्याची तयारी केली आहे.
  • भारत आणि पाकिस्तानमधील मध्यस्थीचा दावा भारताने नाकारल्यामुळे ट्रम्प वैयक्तिक पातळीवर दुखावले गेली आहे .
  • पाकिस्तानसोबत क्रूड ऑईल एक्सप्लोरेशन आणि व्यापार करार जाहीर करून भारतावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे .

Trump News |भारतावर होणारे संभाव्य परिणाम:

टॅरिफचा फटका:

  • IT, फार्मा, टेक्स्टाईल, स्टील यांसारख्या क्षेत्रांतील भारतीय निर्यातीवर त्वरित परिणाम होणार आहे .
  • भारतीय वस्तू अमेरिकेत महाग होऊन स्पर्धेत मागे पडणार आहे .
  • नोकरीच्या संधी कमी, विशेषतः लघु व मध्यम उद्योगांमध्ये परिणाम होणार आहे .
  • रुपया कमजोर होण्याची शक्यता, विदेशी गुंतवणूकदार भारतातून पैसे काढू शकतात.

सेकंडरी सॅंक्शन्समुळे धोका:

  • भारतातील बँका, स्टील कंपन्या, डिफेन्स कंपन्यांना अमेरिकेचे आर्थिक निर्बंध लागू शकतात.
  • भारत-रशिया व्यवहार रुपया-रुबलमध्ये होत असल्याने अमेरिकन डॉलर क्लिअरिंग अडचणीत येऊ शकते.

राजकीय दबाव:

  • अमेरिका भारताला इंडो-पॅसिफिक, QUADमध्ये सामावून घेत असली, तरी टॅरिफद्वारे राजकीय दबाव आणत आहे.
  • भारतासमोर दोन्ही देशांशी (अमेरिका-रशिया) संबंध ठेवण्याचे आव्हान आहे .

चीनची नीती vs भारताची नीती काय होती :

  • चीनने संयमी धोरण स्वीकारले, अमेरिकेच्या अहंकाराशी थेट पंगा न घेता आपले हित जपले.
  • गुप्तता, शांतता आणि शहाणपणा वापरून रशियाशी व्यवहार टिकवले.
  • भारताने मात्र पारदर्शकता दाखवली, ट्रम्प यांचा दावा थेट नाकारला, ज्यामुळे ते नाराज झाले.

भारताने काय शिकायला हवं?

  • परराष्ट्र धोरणात फ्लेक्सिबिलिटी आणि कूटनीतिक संयम आवश्यक आहे.
  • व्यक्तिगत मैत्री (मोदी-ट्रम्प) असूनही, ट्रम्प यांचं प्राधान्य “अमेरिका फर्स्ट” राहणार.
  • भारत अमेरिकेसाठी पर्याय आहे, तर चीन गरज – हे वास्तव समजून धोरण रचायला हवं.

ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे भारतावर आर्थिक आणि राजकीय दडपण येण्याची शक्यता वाढली आहे. भारताने आता परराष्ट्र नीतीत अधिक चतुराई आणि गुप्तता ठेवणे गरजेचे आहे. अमेरिका आणि रशिया दोघांसोबत समतोल राखणं ही भारतासाठी महत्त्वाची पण अवघड भूमिका ठरणार आहे.