Ladki Bahin Yojana | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाखो महिलांना लाभापासून वंचित राहण्याची शक्यता

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना Website : राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या जिल्ह्यातील सुमारे साडेआठ लाख महिलांना लाभ देत आहे. परंतु, दुर्दैवाने यामधील एक लाखांहून अधिक महिला या लाभापासून वंचित राहणार आहेत. कारण, अर्ज करण्यासाठी असलेले पोर्टल बंद झाले आहे.

Majhi Ladki Bahin Yojana | लाडकी बहीण योजना कोणाला लाभ मिळतोय?

या योजनेअंतर्गत २१ ते ६५ वर्षे वयोगटातील महिलांना आर्थिक मदत दिली जाते. अनेक २१ वर्षांवरील युवतीदेखील यासाठी पात्र आहेत, पण पोर्टल बंद असल्याने त्यांना अर्ज करता येत नाही ही सर्वात मोठी समस्या महिलांन पुढे आहे .

Mukhyamantri Ladki Bahin Yojana | पोर्टल बंद होण्यामागचं कारण

या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची मुदत १५ ऑक्टोबर २०२४ होती. त्या तारखेनंतर पोर्टल पूर्णपणे बंद करण्यात आले. अनेक संघटना आणि महिला अर्जदारांनी मुदतवाढीची मागणी केली असली तरी अजूनही त्याबाबत निर्णय आलेला नाही.

ladki bahin yojana कागदपत्रे in marathi | लाडकी बहीण योजना कागदपत्रे

अनेक महिलांना आधार कार्ड अपडेट करण्याच्या प्रक्रियेमध्ये मोठ्या अडचणी आल्या. नाव दुरुस्तीसाठी आता बारकोडयुक्त मतदान ओळखपत्र किंवा पासपोर्ट आवश्यक करण्यात आले आहे.

  • मतदान ओळखपत्र बारकोडयुक्त नसल्यास प्रथम ते अपडेट करावे लागत आहे.
  • पासपोर्ट बहुतेक महिलांकडे नसल्याने १५–२० दिवस प्रक्रिया लांबली जात होती .
  • आधार अपडेटसाठी अर्ज केला तरी काही अर्ज अपुरा पुरावा असल्याचं कारण देऊन नाकारण्यात आले आहे.
घटकमाहिती
योजना नावमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
वयोगट२१ ते ६५ वर्षे
जिल्ह्यातील लाभार्थी महिला~ ८.५ लाख
लाभापासून वंचित महिला१ लाखांहून अधिक
शेवटची अर्ज मुदत१५ ऑक्टोबर २०२४
प्रमुख अडचणीपोर्टल बंद, आधार अपडेट समस्या, कागदपत्रांची कमतरता