आजचे बाजारभाव: हळद झाली सोन्याच्या भावात, आलेने केली निराशा!

आजचे शेतमाल बाजारभाव (11 Aug:): राज्यातील प्रमुख पाच शेतीमालांच्या बाजारभावात काही ठिकाणी सुधारणा तर काही ठिकाणी घसरण दिसून येत आहे. आले, हळद, हिरवी मिरची, केळी आणि सिताफळ या पिकांच्या बाजाराचा आढावा खालीलप्रमाणे –

आले बाजार भाव (Ginger ale):

गेल्या काही दिवसांपासून आलेच्या दरात झालेल्या घसरणीमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. मात्र सध्या आलेला प्रतिक्विंटल ₹2,500 ते ₹3,500 दर मिळत आहे. व्यापाऱ्यांच्या मते, आवक स्थिर झाली तरी मागणी वाढल्याशिवाय दर वाढीची शक्यता कमी आहे.

 हळदीचे भाव आजचे (Turmeric price today):

सणासुदीच्या दिवसांमुळे हळदीच्या मागणीत थोडी वाढ झाली आहे. बाजारात हळदीला प्रतिक्विंटल ₹10,000 ते ₹12,000 असा दर मिळत आहे. पिवळ्या सोनेरी हळदीच्या दरात पुढील काही दिवस स्थिरता राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हिरवी मिरची बाजार भाव आजचे (Green Chilli):

राज्यात हिरव्या मिरचीची आवक कमी असल्याने दरात मजबुती दिसून येत आहे. सध्या हिरव्या मिरचीला बाजारात प्रतिक्विंटल ₹3,500 ते ₹4,000 इतका दर मिळत आहे.

केळी बाजार भाव आजचे (Banana):

श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर केळीला बाजारात चांगला उठाव आहे. राज्यातील बहुतांश बाजारात केळीचे भाव प्रतिक्विंटल ₹1,500 ते ₹2,000 दरम्यान आहेत.

सिताफळ बाजारभाव (Custard Apple)

राज्यात सिताफळाच्या आवकेला सुरुवात झाली असून, बाजारात सध्या त्याला प्रतिक्विंटल ₹4,000 ते ₹4,500 दर मिळत आहे. हंगाम वाढल्यास आवक वाढेल आणि दरात बदल होण्याची शक्यता आहे.