Power Tiller: पावर टिलर ट्रॅक्टर शेतकऱ्यांना खरेदीसाठी मिळणार १.२० लाख रुपयांपर्यंत अनुदान

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सरकारने आधुनिक शेती उपकरण खरेदीवर अनुदान योजना जाहीर केली आहे. यामध्ये पाॅवर टिलर खरेदीसाठी(पावर टिलर ट्रॅक्टर किंमत) १.२० लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे. ही योजना विशेषत: अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक, महिला शेतकरी व अनुसूचित जाती-जमातीतील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा आहे.

आजच्या आधुनिक शेतीत यांत्रिकीकरणाचा वापर वाढत आहे. ट्रॅक्टरसारख्या पॉवर टिलरमुळे शेतातील कामे जलद, सोप्या व कमी श्रमात करता येतात. मात्र, या यंत्रसामग्रीची किंमत जास्त असल्याने लहान शेतकऱ्यांना खरेदी करणे कठीण होते. त्यामुळे राज्य सरकारने कृषी यांत्रिकीकरण प्रोत्साहन योजना सुरू केली आहे.

ट्रॅक्टर/पॉवर टिलर चलित औजारे कोणाला किती अनुदान मिळेल?

  • महिला शेतकरी, SC/ST शेतकरी, अल्पभूधारक व अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना५०% अनुदान मिळेल.
  • इतर प्रवर्गातील शेतकरी यांना → ४०% अनुदान शासनाकडून मिळेल.

Maharashtra Agriculture Scheme :पावर टिलर ची माहिती पॉवर टिलरसाठी अनुदानाची श्रेणी

८ BHP ते ११ BHP पॉवर टिलर(छोटा पावर टिलर)

  • SC/ST, महिला व लहान शेतकरी: ₹१,००,००० पर्यंत अनुदान शासनाकडून मिळेल.
  • इतर प्रवर्गातील शेतकरी आहेत त्यांना : ₹८०,००० पर्यंत अनुदान या योजनेमार्फत मिळेल.

११ BHP पेक्षा जास्त पॉवर टिलर

  • SC/ST, महिला व लहान शेतकरी: ₹१,२०,००० पर्यंत अनुदान शासनाकडून मिळेल.
  • इतर प्रवर्गातील शेतकऱ्यांना : ₹१,००,००० पर्यंत अनुदान मिळेल.

Power Tiller Anudan Yojana Maharashtra|अर्ज करण्यासाठी महत्त्वाच्या अटी

  • एका शेतकऱ्याला फक्त एका यंत्रासाठीच अनुदान मिळणार आहे याची नोंद शेतकऱ्यांनी घ्यावी.
  • पूर्वी जर यंत्रासाठी अनुदान घेतले असेल, तर त्याच प्रकारच्या यंत्रासाठी पुन्हा अर्ज करण्यासाठी १० वर्षांची वेळ मर्यादा आहे.
  • १ लाखांपेक्षा जास्त अनुदान असलेल्या यंत्रांसाठी एका वर्षात फक्त एकाच यंत्रावर अनुदान मिळू शकते.
  • शेतकऱ्यांनी या योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज DBT मार्फत करणे बंधनकारक आहे.

कृषी यांत्रिकीकरण प्रोत्साहन योजना चे फायदे

  • आधुनिक यंत्रे परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध करून देणे.
  • शेतीची कामे जलद, अचूक आणि सोपी व्हावी.
  • शारीरिक श्रम कमीवेळेची बचत होऊन काम वेळेत काम पूर्ण व्हावेत.
  • जास्त उत्पादन व जास्त नफा मिळावा व शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवावे.
  • शेतकऱ्यांचा आर्थिक ताण कमी कमी व्हावा.
  • कमी क्षेत्रातही जास्त उत्पादन घेणे शक्य व्हावे हे या मागचे उद्दिष्ट आहे.

Agriculture Mechanization Scheme 2025 |शेतकऱ्यांना प्रशिक्षण व मार्गदर्शन

या योजनेअंतर्गत केवळ यंत्रसामग्री खरेदीसाठी अर्थसहाय्यच दिले जात नाही तर शेतकऱ्यांना प्रशिक्षण व प्रात्यक्षिकेही दिली जातात. यामुळे शेतकरी नवीन तंत्रज्ञान सहज आत्मसात करू शकतात आणि शेती अधिक फायदेशीर करू शकतात.

महाराष्ट्र सरकारची ही कृषी यांत्रिकीकरण प्रोत्साहन योजना शेतकऱ्यांसाठी मोठा लाभदायक निर्णय ठरला आहे. पॉवर टिलरसारखी महागडी यंत्रसामग्री आता अनुदानामुळे परवडणाऱ्या दरात उपलब्ध होत असल्याने लहान शेतकऱ्यांनाही आधुनिक शेतीकडे वळण्याची संधी मिळणार आहे.