UPSC EPFO Recruitment 2025: संघ लोकसेवा आयोग (UPSC) कडून EPFO मधील Enforcement Officer (EO) व Assistant PF Commissioner या पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया आज, 18 ऑगस्ट 2025 रोजी संपणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी तात्काळ UPSC च्या अधिकृत संकेतस्थळावर upsc.gov.in जाऊन अर्ज करावा.
या भरतीतून एकूण 230 पदे भरली जाणार आहेत.
अर्जासाठी पात्रता (Eligibility)
- उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर (Graduation) असावा.
- भारतीय नागरिकत्व असणे आवश्यक.
अर्ज कसा करावा? (How to Apply)
- सर्वप्रथम UPSC च्या अधिकृत वेबसाइटवर upsc.gov.in लॉगिन करा.
- होमपेजवर दिलेल्या “Apply Online” लिंकवर क्लिक करा.
- नवीन नोंदणीसाठी आवश्यक माहिती भरा.
- युजर आयडी व पासवर्डने लॉगिन करून अर्ज फॉर्म भरा.
- आवश्यक तेवढे शुल्क भरा.
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज सबमिट करा.
- अर्ज सबमिट झाल्यावर त्याची प्रिंट काढून ठेवा.
निवड प्रक्रिया (Selection Process)
- निवड प्रक्रियेत Combined Recruitment Test (CRT) आणि मुलाखत (Interview) यांचा समावेश असेल.
- परीक्षा ही पेन-आणि-पेपर बेस्ड असेल व तिचा कालावधी 2 तासांचा असेल.
- प्रत्येक प्रश्न समान गुणांचा असेल.
- निगेटिव्ह मार्किंग असेल; चुकीच्या उत्तरासाठी त्या प्रश्नाच्या गुणांच्या 1/3 गुण वजा केले जातील.
- एखाद्या प्रश्नाचे उत्तर न दिल्यास गुण कपात होणार नाही.
महत्वाची माहिती
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: 18 ऑगस्ट 2025
- रिक्त पदांची संख्या: 230
- अधिकृत वेबसाइट: upsc.gov.in
UPSC कडून निघालेली ही भरती पदवीधर उमेदवारांसाठी मोठी संधी आहे. इच्छुकांनी आजच अर्ज करून आपली संधी गमावू नये.