महाराष्ट्रात प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी एक मोठी सुविधा म्हणजे आता MSRTC (Maharashtra State Road Transport Corporation) Bus Ticket Booking Online उपलब्ध झाली आहे. आता कुठेही रांगेत उभं राहायची गरज नाही, कारण घरबसल्या मोबाईल अॅपच्या मदतीने सहजपणे ST Bus Ticket Online Booking करता येणार आहे ही गोष्ट प्रवेश आणि लक्षात घ्यायची आहे.
एसटी महामंडळ तिकीट MSRTC App कसं Download करायचं?
- सर्वप्रथम आपल्या मोबाईलवर Google Play Store हे ॲप उघडा.
- सर्च बॉक्समध्ये “MSRTC Bus Reservation” असा टाईप करा तिथे तुम्हाला MSRTC Official App डाउनलोड करून घ्यायचे आहे.
- हे App आपल्या मोबाईल मध्ये Install करून Open करायचे आहे.
- ॲप ओपन करताना ॲप आपल्यालाआवश्यक परवानग्या (Permissions) मागेन ते तुम्ही Accept करायचे आहे.
एसटी महामंडळ बस Account Create आणि Login Process
- App मध्ये तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर प्रवेश करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम Sign In / Register करावं लागेल.
- Create an Account पर्याय निवडून नाव, जन्मतारीख, Gender, Email ID, Mobile Number आणि Password टाकून Account तयार कराचे आहे.
- एकदा Account तयार झाल्यानंतर Email ID व Password टाकून Login करायचे आहे.
Maharashtra ST Bus Reservation Source आणि Destination कसं निवडायचं?
- आता तुमचे मोबाईल ॲप ओपन झालेले असेल त्यामध्ये तुम्ही
- Home Page वर Source (जिथून बस पकडणार) आणि Destination (जिथपर्यंत प्रवास करणार आहात) हे पर्याय निवडायचे आहेत.
- प्रवासाची Date Calendar मधून सिलेक्ट करा.
- नंतर “Check Availability” बटनावर क्लिक करा.
How to book st bus tickets online Bus Availability आणि Seat Selection सर्व प्रोसेस
- निवडलेल्या तारखेसाठी उपलब्ध सर्व बसेसची यादी स्क्रीनवर तुम्हाला दिसेल.
- यात Departure Timing, Arrival Time, Bus Type, Available Seats यासारखी माहिती मिळेल तुम्हाला जी सीट हवी ती तुम्ही निवडू शकता.
- Seat Selection करताना Ladies Seat (Pink), Booked Seat (Blue), General (White) अशा Color Coding पाहायला मिळेल त्यामध्ये तुम्ही योग्य ती सीट निवडा.
- त्यानंतर तुम्ही प्रवासाची माहिती (Name, Gender, Age) भरून सीट Confirm या बटनावर क्लिक करा.
Special Schemes Available प्रवाशांसाठी विशेष सवलत योजना
- महिला सन्मान निधी योजना – या अंतर्गत महिला प्रवाशांसाठी अर्ध्या तिकिटाचा लाभ महिलांना मिळू शकतो.
- Senior Citizen Discount – वयस्क नागरिकांसाठी सवलतीसाठी (आधार/PAN कार्ड असणे आवश्यक आहे).
Online Payment Options उपलब्ध आहे .
Payment करताना खालील पर्याय उपलब्ध आहेत –
- UPI (Google Pay, PhonePe, Paytm इ.) च्या माध्यमातून तुम्ही तुमच्या मोबाईल मधून हे पेमेंट करू शकता ते ही अगदी सोप्या पद्धतीने.
- Debit(ATM Card) / Credit Card चा वापर ही करू शकतो
- Net Banking
Payment Complete झाल्यानंतर तुमचं E-Ticket PDF स्वरूपात Download करता येईल ती पीडीएफ फाईल तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये सेव्ह करून ठेवू शकता किंवा त्याची प्रिंट आउट जवळच्या नेट कॅफे मध्ये जाऊन काढू शकता.
E-Ticket आणि Travel Proof प्रवाशांनी सोबत कोणती कागदे ठेवावीत
- Download केलेलं PDF Ticket मोबाईलमध्ये सेव्ह केलेले किंवा प्रिंट आउट काढलेली प्रवासा दरम्यान प्रवाशांनी आपल्या सोबत ठेवावे.
- General प्रवाशांना कोणत्याही Proof ची गरज नाही.
- Senior Citizen किंवा महिला सन्मान निधी योजनेखाली प्रवास करताना Aadhaar / PAN Card सोबत ठेवणं आवश्यक आहे.
आता महाराष्ट्रात प्रवास अधिक सोपा झाला आहे. MSRTC Online Bus Ticket Booking App मुळे गर्दीत उभं राहण्याची आवश्यकता नाही. मोबाईलवरून काही क्लिकमध्ये तिकीट बुक करा आणि निवांत प्रवासाचा आनंद घ्या.
हे App वापरून पहा आणि महाराष्ट्रातील आपल्या प्रवासाला आणखी सोपं आणि सुखद बनवा.