Gay Gotha Scheme 2025: गायी-म्हशींसाठी गोठा बांधण्यासाठी सरकारकडून २.३१ लाखांपर्यंत अनुदान

गाय गोठा योजना म्हणजे काय?

महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांना दुग्धव्यवसायासाठी मोठी मदत म्हणून ‘गाय गोठा योजना’ राबवत आहे. या योजनेतून गायी-म्हशींसाठी सुरक्षित आणि योग्य गोठा बांधण्यासाठी शेतकऱ्यांना ७७ हजार रुपये ते २ लाख ३१ हजार ५६४ रुपये इतके अनुदान मिळते.

ही योजना शरद पवार ग्राम समृद्धी योजनेचा एक भाग असून २०२१ पासून सुरु आहे. शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा केले जाते.

गाय गोठा योजनेचा उद्देश

  • गायी-म्हशींसाठी योग्य व सुरक्षित गोठ्यांची निर्मिती करणे.
  • जनावरांना पाऊस, थंडी, उष्णता व इतर प्रतिकूल हवामानापासून संरक्षण देणे.
  • जनावरांचे आरोग्य सुधारून दुग्धउत्पादन वाढवणे.
  • शेतकऱ्यांना स्थिर उत्पन्न मिळवून देणे.
  • ग्रामीण अर्थव्यवस्था व दुग्धव्यवसायाला चालना देणे.

किती अनुदान मिळेल? (जनावरांच्या संख्येनुसार)

  • २ ते ६ गायी/म्हशींसाठी – ₹७७,१८८
  • ६ ते १८ गायी/म्हशींसाठी – ₹१,५४,३७३
  • १८ पेक्षा जास्त गायी/म्हशींसाठी – ₹२,३१,५६४

पात्रता व अटी

  • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी शेतकरी असावा.
  • अर्जदाराकडे किमान २ जनावरे असणे आवश्यक.
  • अर्जदाराला पशुपालनाचे ज्ञान असणे बंधनकारक.
  • अर्जदाराचे खाते राष्ट्रीयकृत बँकेत असावे.
  • गोठा बांधण्यासाठीच्या जागेचा ७/१२ उतारा व ८-अ जोडणे आवश्यक.
  • अर्जदाराचा रहिवासी दाखला (सरपंच/पोलिस पाटील कडून) असणे आवश्यक.
  • पशुधन अधिकाऱ्याचा दाखलामनरेगा रोजगार हमी प्रमाणपत्र अनिवार्य.
  • ग्रामपंचायतीकडून शिफारसपत्र मिळणे आवश्यक.

आवश्यक कागदपत्रे

  • आधारकार्ड
  • रहिवासी दाखला
  • ७/१२ उतारा
  • बँक खातेबुक
  • जातीचा दाखला
  • जनावरांचे टॅगिंग प्रमाणपत्र
  • मनरेगा जॉब कार्ड
  • ग्रामपंचायतीचे शिफारसपत्र
  • स्थळ पाहणी अहवाल
  • मोबाईल नंबर व ई-मेल आयडी
  • पासपोर्ट साईज फोटो
  • स्वयंघोषणापत्र

अर्ज कुठे करावा?

शेतकरी या योजनेसाठी अर्ज ग्रामपंचायत कार्यालयात किंवा पंचायत समिती कार्यालयात करू शकतात. तसेच, तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा जिल्हा पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधूनही अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येते.

गाय गोठा योजना 2025 ही शेतकऱ्यांसाठी मोठी संधी आहे. या योजनेमुळे दुग्धव्यवसायाला चालना मिळून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होईल. योग्य गोठ्यामुळे जनावरांचे आरोग्य सुधारेल व दूध उत्पादनात वाढ होईल.