SBI PO Mains 2025 परीक्षा दिनांक जाहीर, तपशील जाणून घ्या

State Bank of India (SBI) ने Probationary Officer (PO) Mains परीक्षा 2025 चा तात्पुरता दिनांक जाहीर केला आहे. वेळापत्रकानुसार SBI PO Mains Exam 2025 ही परीक्षा १३ सप्टेंबर 2025 रोजी होणार आहे.

SBI Careers पोर्टलवर अधिकृत सूचना (Notification) प्रसिद्ध करण्यात आली आहे. बँकेनुसार, SBI PO Mains Admit Card 2025 व इतर मार्गदर्शक सूचना लवकरच sbi.co.in या वेबसाईटवर उपलब्ध होतील.

SBI PO Prelims Result 2025 जाहीर

SBI PO Prelims Result 2025 काल म्हणजेच १ सप्टेंबर 2025 रोजी जाहीर झाला आहे. उमेदवार खालील लिंकवर जाऊन आपला निकाल पाहू शकतात:

👉 SBI PO Prelims Result Link 2025 येथे क्लिक करा

या आधी SBI PO Prelims Exam 2025 २ ऑगस्ट, ४ ऑगस्ट आणि ५ ऑगस्ट 2025 रोजी घेण्यात आला होता.

SBI PO Mains Admit Card 2025 कसे डाउनलोड करावे?

उमेदवारांनी खालील स्टेप्स फॉलो करून SBI PO Mains Call Letter 2025 डाउनलोड करू शकतात:

  1. अधिकृत वेबसाइट sbi.co.in ला भेट द्या.
  2. होमपेजवरील Careers विभागावर क्लिक करा.
  3. Current Openings मध्ये जाऊन SBI PO 2025 टॅब निवडा.
  4. तेथे दिलेला Mains Exam Call Letter Download Link वर क्लिक करा.
  5. आपले लॉगिन डिटेल्स टाका व सबमिट करा.
  6. तुमचा SBI PO Result / Admit Card स्क्रीनवर दिसेल.
  7. निकाल/प्रवेशपत्र डाउनलोड करून प्रिंट काढून ठेवा.

SBI PO भर्ती 2025 तपशील

या भरती मोहिमेतून एकूण 541 PO पदे भरली जाणार आहेत. यामध्ये 500 Regular Vacancy आणि 41 Backlog Vacancy समाविष्ट आहेत.