दिवाळीला भेट! GST Reform मुळे घी, स्नॅक्स, AC, Fridge आणि कार होणार स्वस्त

GST Reform 2025: दिवाळीपूर्वी सामान्य जनतेला मोठा दिलासा मिळू शकतो. घी, मक्खन, स्नॅक्स, रेडी-टू-ईट Items पासून AC, TV, Refrigerator आणि Automobile पर्यंतच्या 175 वस्तूंच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे. कारण GST Council Meeting ची 56वी बैठक सुरू झाली आहे आणि या बैठकीत मोठे निर्णय घेण्यात येऊ शकतात.

GST News दोनच Tax Slab ची शक्यता

15 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून नवे GST Reform आणण्याची घोषणा केली होती. त्यानुसार आता GST Council मध्ये केवळ दोन Tax Slab ठेवण्यावर चर्चा होत आहे.

  • 28% स्लॅबमधील वस्तू 18% मध्ये आणल्या जाऊ शकतात.
  • 12% स्लॅबमधील वस्तू 5% मध्ये येऊ शकतात.
  • तर Luxury आणि हानिकारक वस्तूंवर 40% पर्यंत Tax राहणार आहे.

यामुळे सध्या 11.5% एवढा असलेला Average GST Rate 10% खाली येईल अशी अपेक्षा आहे.

कोणत्या वस्तू होतील स्वस्त(GST Rate Cut)?

मिळालेल्या माहितीनुसार सुमारे 175 Items वर GST Rate Cut होऊ शकतो. यामध्ये –

  • Food Items: घी, मक्खन, चीज, जॅम, अचार, मुरंबा, चटणी, स्नॅक्स, फ्रोजन व्हेजिटेबल्स
  • Electronics: AC, Refrigerator, TV, Solar Water Heater
  • Automobile Sector: Tractor, Car, SUV
  • Other Products: छत्री, Cement, Agricultural Equipment

Health Insurance Premium GST छूट

GST Council मध्ये सर्वात मोठा प्रस्ताव म्हणजे Health आणि Life Insurance Premium वर पूर्णपणे GST छूट देण्याचा आहे. जर हा प्रस्ताव मंजूर झाला, तर सामान्य लोकांना थेट फायदा होईल. मात्र यामुळे सरकारच्या उत्पन्नात जवळपास 9,700 कोटी रुपयांची घट होण्याची शक्यता आहे.

कंपन्यांपासून सामान्य माणसापर्यंत उत्सुकता

या बैठकीत होणाऱ्या निर्णयांची उत्सुकता Companies, Market आणि Common People यांना लागली आहे. कारण एकीकडे Daily Use Products स्वस्त होतील तर दुसरीकडे Electronics आणि Automobile Sector मध्ये मोठा बदल होऊ शकतो.