भारतामध्ये Vice Presidential Election 2025 मोठ्या उत्साहात पार पडले आहे. Vice President Election Results आज सायंकाळी जाहीर होणार असून निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
उपराष्ट्रपती पदासाठी चुरशीची लढत
या निवडणुकीत NDA कडून महाराष्ट्राचे राज्यपाल CP Radhakrishnan हे उमेदवार असून, INDIA Bloc कडून माजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती B Sudershan Reddy यांनी उमेदवारी दाखल केली आहे. त्यामुळे Vice President of India 2025 पदासाठी थेट NDA विरुद्ध INDIA Bloc अशी लढत होत आहे.
मतदानाचा टक्का
- एकूण 781 खासदारांपैकी 762 खासदारांनी मतदान केले.
- दुपारी 3 वाजेपर्यंत 97.57% polling percentage नोंदवले गेले.
- मतदान प्रक्रिया सकाळी 10 वाजता सुरू होऊन सायं. 5 वाजेपर्यंत चालली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वात पहिले मतदान करणारे खासदार ठरले.
मतदान प्रक्रिया
- VP Election 2025 साठी संसद भवनात मतदान केंद्र उभारण्यात आले.
- Lok Sabha चे 542 खासदार आणि Rajya Sabha चे 239 सदस्य या निवडणुकीतील मतदार आहेत.
- सर्व मतांचे समान मूल्य असून, मतदान गुप्तपद्धतीने झाले.
- विजयासाठी आवश्यक बहुमत आहे 391 मते.
निकाल कधी?
- मतदान पूर्ण झाल्यानंतर लगेचच मतमोजणी सुरू होणार आहे.
- Vice President Election Results 2025 आजच जाहीर होतील.
- निकाल जाहीर करण्याचे काम संध्याकाळी उशिरापर्यंत पूर्ण होईल.
राजकीय समीकरण
NDA ला आपल्या बहुमतामुळे विजयाचा आत्मविश्वास आहे. तर INDIA Bloc ने सर्व विरोधी पक्षांना आवाहन करून VP Election Result मध्ये संविधान वाचवण्यासाठी न्यायमूर्ती रेड्डी यांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे.
उपराष्ट्रपती पद रिक्त का झाले?
माजी उपराष्ट्रपती Jagdeep Dhankhar यांनी 21 जुलै रोजी आरोग्याच्या कारणास्तव राजीनामा दिला. त्यानंतर हे पद रिक्त झाले होते.
आजचा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे कारण भारताला नवा Vice President मिळणार आहे. Vice President Election Result जाहीर झाल्यानंतर पुढील पाच वर्षांसाठी कोण या पदावर विराजमान होईल याचा निर्णय होईल