गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde)शेतकरी अपघात योजना :शेतकऱ्यांना आता अपघात विमा योजना मिळणार आहे. काय आहे योजना?गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना कागदपत्रे? कोणत्या अपघातग्रस्तांना मिळणार मदत ? कुठे सादर करता येणार प्रस्ताव? जाणून घ्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेंतर्गत शेतकऱ्यांला २ लाख मदत मिळणार आहे . राज्यामध्ये शेती व्यवसाय करणारे शेतकरी जे आहेत त्यांचा दुर्दैवी रित्या कधी कधी अनावधानाने अपघात घडतो ,किंवा अन्य कारणामुळे सुद्धा ते अपघाती त्यांना मृत्यू ओढवला जातो. तर अशा कारणासाठी राज्यशासनाने एक पुरोगामी विचार करून अत्यंत महत्त्वाकांक्षी अशी योजना आहे .
अनुदानासाठी लागू असलेले अपघात(Apghat vima list):-
- पाण्यात बुडून मृत्यू होणे,
- कीटकनाशके हाताळतांना अथवा अन्य कारणामुळे होणारी
- शेती व्यवसाय करतांना होणारे अपघात
- वीज पडणे,
- पूर, सर्पदंश
- विंचूदंश
- विजेचा शॉक बसणे
- नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात
- रस्त्यावरील अपघात
- वाहन अपघात,
- अन्य कोणत्याही कारणांमुळे होणारे अपघात
लाभार्थ्याचे पात्रता निकष:
Gopinath Munde Farmer Accident Insurance Scheme राज्यातील सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी व वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले शेतकऱ्याच्या कुटुंबातील कोणताही १ सदस्य (आई-वडील, शेतकऱ्याची पती/पत्नी, मुलगा व अविवाहीत मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती) असे १० ते ७५ वर्ष वयोगटातील एकुण २ जणांकरीता “गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना” राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे.
सदर योजनेच्या प्रयोजनार्थ कुटुंबातील वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले १ सदस्यांमध्ये आई-वडील, शेतकऱ्याची पती/पत्नी, मुलगा व अविवाहीत मुलगी यांचा समावेश ग्राह्य धरण्यात येईल.कृषि गणनेनुसार निर्धारित केलेल्या वहितीधारक खातेदार शेतकरी व वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले शेतकऱ्याच्या कुटुंबातील कोणताही १ सदस्य असे एकुण २ जणांकरीता गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत खालील लाभ अनुज्ञेय असतील :-
योजनेअंतर्गत देय असलेले अनुदान
अ.क्र. | अपघाताची बाब | नुकसान भरपाई |
1 | अपघाती मृत्यू | रु.२,००,०००/- |
2 | अपघातामुळे दोन डोळे अवा दोन अवयव निकामी होणे. | रु.२,००,०००/- |
3 | अपघातामुळे एक डोळा व एक अवयव निकामी होणे | रु.२,००,०००/- |
4 | पघातामुळे एक डोळा व एक अवयव निकामी होणे | रु.१,००,०००/- |
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना कागदपत्रे(Gopinath munde apghat vima yojana documents):-
- ७/१२ उतारा.
- मृत्यूचा दाखला.
- शेतकऱ्यांचे वारस म्हणून गावकामगार तलाठ्याकडील गांव नमुना नं. ६ – क नुसार मंजूर झालेली वारसाची नोंद.
- शेतक-याच्या वयाच्या पडताळणी करीता शाळा सोडल्याचा दाखला / आधारकार्ड / निवडणूक ओळखपत्र. ज्या कागदपत्रा आधारे ओळख/वयाची खात्री होईल असे कोणतेही कागदपत्रे.
- प्रथम माहिती अहवाल / स्थळ पंचनामा / पोलीस पाटील माहिती अहवाल.
- अपघाताच्या स्वरुपानुसार अंतिम विमा प्रस्तावासोबत सादर करावयाची कागदपत्रे.
अपघाताच्या स्वरुपानुसार अंतिम विमा प्रस्तावासोबत सादर करावयाची कागदपत्रे
अ.क्र. | अपघाताचे स्वरुप | आवश्यक कागदपत्रे |
1 | रस्ता / रेल्वे अपघात | आवश्यक कागदपत्रे इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मोर्टेम अहवाल, विमा संरक्षित व्यक्ती वाहन चालविताना अपघात झाल्यास त्याचा मोटार वाहन परवाना. |
2 | पाण्यामध्ये बुडून मृत्यू | इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मोर्टेम अहवाल, बुडून बेपत्ता | झाल्यास फक्त प्रथम माहिती अहवाल व शतीपूर्ती बंधपत्र आवश्यक. |
3 | जंतूनाशक अथवा अन्य/कारणामुळे विषबाधा | इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मोर्टेम अहवाल, रासायनिक विश्लेषण अहवाल (व्हिसेरा अहवाल). |
4 | विजेचा धक्का अपघात | इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मोर्टेम अहवाल. |
5 | विज पडून मृत्यू | इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मोर्टम अहवाल.. |
6 | खून | इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मोर्टेम अहवाल, रासायनीक विश्लेषण अहवाल (व्हिसेरा अहवाल), दोषारोप पत्र |
7 | उंचावरून पडून झालेला मृत्यू | इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मोर्टेम अहवाल, पोलिस अंतिम अहवाल |
8 | मृत्यू सर्पदंश / विंचू दंश | इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मोर्टेम अहवाल, वैद्यकीय उपचारा पुर्वीच निधन झाल्याने पोस्ट मॉर्टेम झाले नसल्यास या अहवालातून सूट मात्र वैद्यकीय अधिका-याचे प्रमाणपत्र शासकीय आरोग्य केंद्र अधिका-याकडून प्रतिस्वाक्षरीत असणे आवश्यक. |
9 | नक्षलवाद्याकडून झालेल्या हत्या | इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मोर्टेम अहवाल, नक्षलवादी | हत्येसंदर्भातील कार्यालयीन कागदपत्र |
ते एक आर्थिक मदत आहे परंतु जे आर्थिक संकट तुमच्या कुटुंबावर येणार आहे त्या कुटुंबाचा विचार करून आपण ज्या शेतात काम करतो किंवा ज्या नेहमीच्या आपली वाटचाल आहे शेताकडे जाण्याची, दैनंदिन कामकाजाची पद्धत आहे. त्यामध्ये आपलं स्वतःच संरक्षण करून जर का शेती व्यवसाय केला तर नक्कीच ते शेतकरी स्वतः आणि त्याचे कुटुंब सुद्धा आनंदी राहू शकते.