Agriculture Irrigation Subsidy 2025 | ठिबक व तुषार सिंचनासाठी मिळणार ५५% अनुदान

केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना – प्रती थेंब अधिक पिक या योजनेअंतर्गत ठिबक (Drip) व तुषार (Sprinkler) सिंचनासाठी ५५% पर्यंत अनुदान मिळणार आहे. या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना कमी पाण्यात जास्त उत्पादन, पिकांची गुणवत्ता वाढ आणि शेती खर्चात बचत मिळवून देणे हा आहे.

शेतकऱ्यांच्या शेतीत पाण्याचा काटकसरीने वापर व्हावा आणि कमी पाण्यात जास्त उत्पादन मिळावे, यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (PMKSY) – प्रती थेंब अधिक पिक सुरू केली आहे. या योजनेतून महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनासाठी (ड्रिप व स्प्रिंकलर) मोठ्या प्रमाणात अनुदान मिळत आहे.

ठिबक सिंचन व तुषार सिंचन माहिती (योजनेचा उद्देश)

  • शेतीत उपलब्ध पाण्याचा जास्तीत जास्त कार्यक्षम वापर करने हा आहे.
  • ठिबक (Drip) व तुषार (Sprinkler) सिंचनाचा प्रचार व प्रसार करणे हा आहे त्याच्यामुळे अनेक शेतकऱ्यांना फायदा होईल.
  • शेतकऱ्यांना आधुनिक सिंचन तंत्रज्ञान वापरण्यास प्रोत्साहन होईल ज्याच्यामुळे शेतकऱ्याला आर्थिक फायदा होईल.
  • पाण्याची बचत करून “प्रती थेंब अधिक पिक” हा उद्देश साध्य करणे हा आहे.

निधी व आर्थिक तरतूद (Pradhanmantri Krishi Sinchan Yojana)

महाराष्ट्रासाठी केंद्र आणि राज्य सरकारने मिळून मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर केला आहे.

  • एकूण मंजूर निधी : ₹789.41 कोटी इतकी आहे.
    • त्यापैकी सूक्ष्म सिंचनासाठी : ₹656.08 कोटी उपलब्ध आहेत.
    • पाणी व्यवस्थापनासाठी : ₹133.33 कोटी ही आहे.

हा निधी जिल्हानिहाय शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिला जाणार असून अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाईल.

ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन या साठी पात्रता आणि अटी

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना काही महत्वाच्या अटी पूर्ण कराव्या लागतील –

  1. शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर जमीन (7/12 उतारा असणे आवश्यक आहे).
  2. अर्जदाराकडे कमीत कमी ०.६० हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे.
  3. कायमस्वरूपी पाणी स्रोत असणे (कूपनलिका, तलाव, नाला, बांधारा).  आवश्यक आहे.
  4. विद्युत पंप किंवा सोलर पंपाची सुविधा असणे महत्त्वाचे आहे.
  5. आधार कार्ड व बँक खाते लिंक असणे बंधनकारक आहे.
  6. एका शेतकऱ्यासाठी जास्तीत जास्त ५ हेक्टर क्षेत्रापर्यंत अनुदान मिळू शकते.
  7. मागील १० वर्षांत ज्यांनी सूक्ष्म सिंचनासाठी अनुदान घेतले आहे, त्यांना पुन्हा लाभ नाही हे शेतकऱ्यांनी लक्षात घ्या.
  8. अनुसूचित जाती-जमाती, महिला व अल्पभूधारक शेतकऱ्यांना विशेष प्राधान्य.

शेतकऱ्यांना मिळणारे अनुदान (Agriculture drip irrigation system)

  • लघु व अल्पभूधारक शेतकरी – 55% अनुदान शासनामार्फत मिळते.
  • इतर शेतकरी – 45% अनुदान शासनाकडून दिले जाते.
  • फळबागांसाठी किमान 25% निधी राखीव ठेवण्यात आला आहे.
  • अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात PFMS प्रणालीद्वारे जमा होणार आहे, त्यामुळे शेतकऱ्याचे आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न असावे.

अर्ज करण्याची प्रक्रिया (ऑनलाईन)

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतील अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे.

  1. नोंदणी (ई-ठिबक पोर्टलवर):
  2. अर्ज सादर करणे:
    • शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल वर नोंदणी करून अर्ज करावा.
    • नोंदणी पूर्ण झाल्यावर अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावा.
    • पाणी स्रोत, जमीन उतारा, पंपाची माहिती जोडणे  बंधनकारक आहे
    • अर्ज स्थिती SMS द्वारे शेतकऱ्याच्या मोबाईल वरती कळवली जाते.
    • मंजुरीनंतर अनुदानाची रक्कम थेट बँक खात्यात जमा होते.
  3. मंजुरी व खरेदी:
    • मंजुरीनंतर शेतकरी कृषी आयुक्तालयाकडे नोंदणीकृत कंपन्यांकडून ड्रिप/स्प्रिंकलर युनिट खरेदी करू शकतो.
    • यासाठी कंपनीकडून दिलेले बील आणि माहिती ऑनलाईन प्रणालीवर अपलोड करणे बंधनकारक आहे.
  4. तपासणी व अनुदान वितरण:
    • तालुका कृषी अधिकारी व मंडळ पातळीवर तपासणी केली जाईल.
    • तपासणी पूर्ण झाल्यानंतर अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाईल.

ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन (आवश्यक कागदपत्रे)

  • शेतकरी ओळखपत्र (आधारकार्ड).
  • आधारशी जोडलेले बँक खाते फेसबुक आवश्यक आहे.
  • ऑनलाइन अर्जाची छापील प्रत.
  • पूर्वसंमती पत्र व हमीपत्र.
  • सूक्ष्म सिंचनाचा आराखडा व प्रमाणपत्र.
  • शेताचा भूगोलिक स्थान नकाशा व फोटो.
  • Tax Invoice (बिलाची मूळ प्रत) GST bill असणे आवश्यक आहे.
  • वीज पंप/सोलर पंप कागदपत्रे व मागील वीज बिल असणे आवश्यक आहे.

ठिबक सिंचन पद्धतीचे फायदे कोणते आहेत (योजनेची खास वैशिष्ट्ये)

  • कमी पाण्यात जास्त उत्पादन मिळू शकते.
  • मृदा व पाणी संवर्धनाला चालना मिळते.
  • उत्पादन खर्च कमी व उत्पन्न वाढते.
  • ऊस, कापूस, केळी यांसारख्या पिकांसाठी महाराष्ट्रात ठिबक सिंचनाचा वापर प्रामुख्याने कोणत्या पिकांसाठी केला जातो.
  • पाण्याची कमतरता असलेल्या भागात आधुनिक तंत्रज्ञान पोहोचवणे शेतकऱ्याला प्रगतशील बनवणे.
  • पारदर्शक ऑनलाईन प्रक्रिया – दलाल व भ्रष्टाचाराला आळा बसवणे.
  • कृषी विभागाच्या देखरेखीखाली काटेकोर अंमलबजावणी केली जाते.

Drip Irrigation Mahiti

  • पिकांना वेळेवर आणि आवश्यक तेवढेच पाणी मिळते.
  • खत व पाण्याची बचत होऊन उत्पादनात वाढ.
  • उष्णकटिबंधीय भागातही पिके तग धरतात.
  • शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यास मदत.

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना – प्रती थेंब अधिक पिक ही योजना शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने वरदान आहे. सूक्ष्म सिंचन तंत्रज्ञान वापरल्याने पाण्याची बचत होऊन उत्पादन वाढते. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन शेती आधुनिक बनवाव