बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म| 32 पेक्षा जास्त लाभ घेण्यासाठी आत्ताच अर्ज करा

बांधकाम कामगार योजना म्हणजे काय?(Bandhkam Kamgar Yojana)

बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांसाठी महाराष्ट्र शासनाकडून Bandhkam Kamgar Yojana राबवली जाते. या योजनेअंतर्गत कामगारांना 32 पेक्षा जास्त विविध लाभ मिळतात. यात भांडी वितरण, लग्नासाठी आर्थिक मदत, मुलांसाठी शिष्यवृत्ती (Scholarship), आरोग्य तपासणी, गंभीर आजार उपचार खर्च, घर बांधण्यासाठी मदत, तसेच नैसर्गिक व अपघाती मृत्यूनंतर आर्थिक सहाय्य दिले जाते हा बांधकाम कामगार योजने चा फायदा आहे .

बांधकाम कामगार योजना अर्जासाठी पात्रता (Eligibility)

बांधकाम कामगार योजनेसाठी नोंदणी करताना खालील निकष पूर्ण करणे आवश्यक आहे:

  • अर्जदाराने किमान 90 दिवसांचे बांधकाम क्षेत्रातील काम केलेले असावे.
  • वय व इतर अटी वेबसाईटवर तपासता येतात.
  • कामगाराकडे आधार कार्ड, पत्ता पुरावा आणि 90 दिवसांचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म documents

  • आधार कार्ड
  • पत्त्याचा पुरावा
  • 90 दिवसांचे कामाचे प्रमाणपत्र (Contractor/Developer/Govt. Authority कडून दिलेले)
  • पासपोर्ट साईज फोटो
  • कौटुंबिक माहिती (आई, वडील, पत्नी/पती, पहिल्या दोन मुलांची माहिती)

बांधकाम कामगार योजना फॉर्म (Bandhkam Kamgar Yojana Online Registration)

अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या 👉 mahakamgar.mahabocw.in

  1. वेबसाईटवर जाऊन “कामगार नोंदणी” या पर्यायावर क्लिक करा.
  2. पात्रता तपासा – जन्मतारीख, आधार व 90 दिवसाचे प्रमाणपत्र याची नोंद करा.
  3. अर्ज फॉर्म उघडल्यावर नाव, पत्ता, मोबाईल नंबर, कौटुंबिक माहिती भरा.
  4. व्यवसाय (Helper, Plumber, Carpenter, Electrician इ.) आणि Employer Details टाका.
  5. आधार कार्ड व 90 दिवसांचे प्रमाणपत्र JPG/PNG/PDF स्वरूपात अपलोड करा.
  6. अपॉईंटमेंट स्लॉट निवडा – जर स्लॉट उपलब्ध नसेल तर नंतर पुन्हा प्रयत्न करा.
  7. फॉर्म सबमिट करून OTP Verify करा.
  8. सबमिशन झाल्यानंतर Application Number आणि Receipt मिळेल. ही प्रिंट करून ठेवा.

तपासणी व पुढील प्रक्रिया |बांधकाम कामगार योजना फॉर्म

  • अर्जदाराने ठरलेल्या सुविधा केंद्रात अपॉईंटमेंटच्या दिवशी मूळ कागदपत्रे घेऊन जावे.
  • तिथे फोटो, अंगठ्याचा ठसा व कागदपत्र पडताळणी केली जाईल.
  • पडताळणीनंतर तुमचा अर्ज मंजूर होईल आणि योजना लाभ मिळू लागतील.

Bandhkam Kamgar Yojana 2025 ही बांधकाम क्षेत्रातील मजुरांसाठी मोठा आधार आहे. योग्य कागदपत्रे व माहिती भरून ऑनलाईन अर्ज केल्यास कामगार व त्यांच्या कुटुंबियांना शैक्षणिक, आरोग्य व आर्थिक सहाय्य मिळू शकते