भजनी मंडळांना ₹२५,००० भांडवली अनुदान; ऑनलाईन अर्ज कसा कराल ते जाणून घ्या

महाराष्ट्र भजनी मंडळ अनुदान राज्यातील भजनी मंडळांसाठी सांस्कृतिक कार्य विभागामार्फत महत्त्वाची योजना सुरू करण्यात आली आहे. भजनी मंडळ भांडवली अनुदान योजना अंतर्गत पात्र मंडळांना एकवेळ ₹२५,००० भांडवली अनुदान देण्यात येणार आहे. या माध्यमातून हार्मोनियम, टाळ, पखवाज किंवा इतर भजन साहित्य खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत मिळणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

योजनेची महत्त्वाची वैशिष्ट्ये (Maharashtra Bhajani Mandal Subsidy)

  • अनुदान रक्कम : ₹२५,००० (एकवेळ भांडवली अनुदान)
  • पात्र लाभार्थी : राज्यातील भजनी मंडळे, आराध्य मंडळे, शाहीर, तमाशा मंडळे इत्यादी सांस्कृतिक गट
  • अर्ज कालावधी : २३ ऑगस्ट २०२५ ते ६ सप्टेंबर २०२५
  • लाभार्थी संख्या : एकूण १८०० भजनी मंडळांना या योजनेचा लाभ मिळणार

भजनी मंडळ ऑनलाईन अर्ज (Mahaanudan Bhajani Mandal Registration)

भजनी मंडळ अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा? महा अनुदान अधिकृत संकेतस्थळ वर अर्ज भरावा लागेल.

  1. संकेतस्थळावर जाऊन “संस्था भजनी मंडळ नोंदणी” वर क्लिक करा.
  2. नवीन नोंदणी करताना विभाग, जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत/नगरपालिका माहिती भरावी.
  3. भजनी मंडळाचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर (OTP व्हेरिफिकेशनसाठी), ईमेल आयडी प्रविष्ट करावा.
  4. लॉगिन केल्यानंतर “भजनी मंडळ भांडवली अनुदान योजना” पर्याय निवडून अर्ज सादर करावा.

भजनी मंडळ अनुदान अर्जासाठी लागणारी कागदपत्रे

  • भजनी मंडळाचा बँक खाते तपशील (IFSC कोड, खाते क्रमांक, बँक शाखा)
  • पॅन कार्ड क्रमांक
  • ग्रामपंचायतीचा दाखला (भजनी मंडळ नोंद असल्याबाबत)
  • मागील ३ वर्षांतील सांस्कृतिक कार्याची माहिती
  • कार्यक्रमांची छायाचित्रे, वृत्तपत्रातील कात्रणे, आमंत्रण पत्रिका
  • भजनी मंडळातील सदस्यसंख्या व कार्यक्षेत्राची माहिती

महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य योजना

राज्यातील अनेक भजनी मंडळांना ही योजना अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. सांस्कृतिक परंपरेचे जतन व प्रसार करण्यासाठी शासनाकडून दिले जाणारे हे अनुदान उपयोगी ठरेल. इच्छुक मंडळांनी दिलेल्या तारखेत mahaanudan.org या संकेतस्थळावर अर्ज करणे आवश्यक आहे.

👉 आपण देखील भजनी मंडळ चालवत असाल आणि भजन साहित्य खरेदी करू इच्छित असाल, तर ही योजना आपल्या मंडळासाठी मोठी मदत ठरू शकते.