बॉम्बे हायकोर्ट भरती २०२५ – २६ Personal Assistant (Bombay High Court Bharti 2025) पदांसाठी अर्ज सुरु

मुंबई | बॉम्बे हायकोर्ट (Bombay High Court) येथे Personal Assistant (PA) पदासाठी मोठी भरती जाहीर आली आहे. या भरतीद्वारे एकूण ३६ जागा भरण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून अर्ज प्रक्रिया १८ ऑगस्ट २०२५ ते १ सप्टेंबर २०२५ या कालावधीत सुरु राहणार आहे.


भरतीचे तपशील |Bombay High Court Peon Vacancy 2025

पदाचे नावएकूण जागाSelect ListWait ListPay Scale
Personal Assistant (PA)363509₹67,700 – ₹2,08,700 + Allowances

पात्रता अटी

  • शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :
    • मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे(Graduate Degree) आवश्यक आहे.
    • English Shorthand Exam (120 w.p.m. speed) उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.
    • English Typing Exam (50 w.p.m. speed) उत्तीर्ण झालेली असावी.
    • Computer Knowledge Certificate आवश्यक आहे. (उदा. एम एस सी आय टी, ट्रिपल सी)
    • Law Degree धारक उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
  • वयोमर्यादा (Age Limit) :
CategoryMinimum AgeMaximum Age
General (Open)21 yrs38 yrs
SC / ST / OBC / SBC21 yrs43 yrs
Government / High Court कर्मचारी21 yrsNo Limit

परीक्षा पद्धती (Exam Pattern) |Bombay High Court Bharti 2025 Syllabus

टप्पागुणतपशील
Shorthand Test40 Marks600 शब्दांचे डिक्टेशन (5 मिनिटे) व 35 मिनिटांत Transcription
Typing Test40 Marksइंग्रजी टायपिंग – 500 शब्द (10 मिनिटे)
Viva-Voce (Interview)20 Marksसंवादकौशल्य व आत्मविश्वास तपासला जाईल

उमेदवाराने प्रथम Shorthand Test उत्तीर्ण केल्याशिवाय Typing Test देता येणार नाही, आणि दोन्ही उत्तीर्ण झाल्यानंतरच Viva-होईल याची नोंद विद्यार्थ्यांनी घ्यावी.


अर्ज प्रक्रिया | Bombay High Court Recruitment 2025 Online Apply

  • अर्ज फक्त ऑनलाइन bombayhighcourt.nic.in या अधिकृत वेबसाईटवर करावा.
  • Examination Fee : ₹1000/- (SBI Collect द्वारे Online Payment). सुविधा उपलब्ध आहे.
  • Passport Size Photo व Signature JPEG format मध्ये Upload करणे आवश्यक आहे.
  • अपूर्ण किंवा चुकीची माहिती दिल्यास अर्ज रद्द होईल याची दक्षता विद्यार्थ्यांनी घ्यावी.

महत्वाच्या तारखा | Bombay High Court Bharti 2025 Last Date

  • अर्ज सुरू : १८ ऑगस्ट २०२५ (११:०० am)
  • शेवटची तारीख : १ सप्टेंबर २०२५ (५:०० pm)

बॉम्बे हायकोर्ट भरती महत्वाची सूचना

  • निवड झालेल्या उमेदवारांची Select List व Wait List २ वर्षे वैध राहणार आहे.
  • उमेदवारांना सुरुवातीला २ वर्षे Probation Period असेल.
  • निवड झाल्यानंतर किमान ५ वर्षे Transfer साठी अर्ज करता येणार नाही.

या सर्व माहितीचे विद्यार्थ्यांनी नोंद घेऊन ऑनलाइन अर्ज करावा आणि आपल्या या लोक माहिती डॉट कॉम या वेबसाईटला शेअर करा