दुग्धव्यवसाय कसा करावा|Dairy Business Management मार्गदर्शन

Dairy Business हा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी एक स्थिर व नफ्याचा व्यवसाय मानला जातो. मात्र, Dairy Management योग्य प्रकारे केले नाही, तर दुधाळ जनावरांची उत्पादकता कमी होऊ शकते. दुग्ध व्यवसायाचे यश प्रामुख्याने गाई-म्हशींची निवड, गोठा व्यवस्थापन, चारा पुरवठा, आरोग्य व प्रजनन व्यवस्थापनावर अवलंबून असते.

दुग्ध व्यवसायाचे नियोजन (Dairy Business Planning)

दुग्ध व्यवसाय सुरू करण्यापूर्वी योग्य माहिती व प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे.

  • पशुवैद्यक व पोषणतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
  • कर्ज व वित्तीय नियोजनासाठी तज्ज्ञांचा मार्गदर्शन घ्यावे.
  • प्रारंभिक गुंतवणूक व व्यवसायाचा आराखडा तयार करावा.

यामुळे दुधाळ जनावरांचे योग्य management of dairy industry साध्य होते.

गोठा व्यवस्थापन (Cattle Shed Management)

गोठा व्यवस्थापन हे Dairy Business मधील सर्वात महत्त्वाचे अंग आहे.

  • गोठा स्वच्छ, हवेशीर आणि प्रकाशमान असावा.
  • उन्हाळ्यात जनावरांना सावलीत, पावसाळ्यात वायुविजन असलेल्या गोठ्यात आणि हिवाळ्यात थंड वाऱ्यापासून सुरक्षित ठिकाणी ठेवावे.
  • पाण्याचा हौद स्वच्छ ठेवावा व चुना लावावा, यामुळे रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो.
  • जनावरांना पुरेशी मोकळी जागा मिळावी आणि दाटी टाळावी.

पोषण व्यवस्थापन (Balanced Nutrition for Dairy Animals)

Dairy Management मध्ये आहार व्यवस्थापनाला विशेष महत्त्व आहे.

  • हिरवा व कोरडा चारा संतुलित प्रमाणात द्यावा.
  • दुधाळ जनावरांना खनिज क्षार (2%) व मीठ (1%) आहारात देणे आवश्यक आहे.
  • गायीला प्रत्येक 3 लिटर दुधासाठी 1 किलो खुराक द्यावा.
  • म्हशीला 2.5 लिटर दुधासाठी 1 किलो खुराक द्यावा.
  • उन्हाळ्यात दिवसातून 4 वेळा तर हिवाळ्यात 2 वेळा ताजे पाणी द्यावे.

यामुळे दूध उत्पादन वाढते व जनावरांचे आरोग्य चांगले राहते.

दुधाळ जनावरांची देखभाल (Dairy Animal Care)

दुधाळ जनावरांची देखभाल योग्य नसेल तर दुधाचे उत्पादन घटते.

  • जनावरांना रोज आंघोळ घालावी किंवा कास कोमट पाण्याने धुवावी.
  • परजीवी टाळण्यासाठी औषधांचा वापर करावा.
  • जनावरांसाठी विश्रांतीची स्वतंत्र जागा असावी.
  • प्रसूतीनंतर प्रजनन आजार टाळण्यासाठी वेळीच तपासणी करून उपचार करावेत.
  • लसीकरण नियमित करावे.

दूध उत्पादन वाढविण्यासाठी उपाय (Milk Production Management)

  • योग्य पद्धतीने दूध काढावे.
  • ऑक्सिटोसिनचा वापर टाळावा.
  • दुधाळ जनावरांचे रिकामे ऋतुचक्र जाऊ देऊ नये.
  • व्यायल्यानंतर 60 ते 90 दिवसांत गर्भधारणा झाली पाहिजे.
  • दर 2-3 महिन्यांचा भाकड काळ ठेवणे आवश्यक आहे.

Dairy Business मध्ये यशस्वी होण्यासाठी Dairy Management, गोठा व्यवस्थापन, संतुलित आहार, आरोग्य व प्रजनन व्यवस्थापन या सर्व गोष्टींचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे. योग्य नियोजन आणि आधुनिक पद्धतींचा अवलंब केल्यास दुग्ध व्यवसाय शेतकऱ्यांसाठी मोठ्या उत्पन्नाचे साधन ठरू शकतो.