E-Pik Pahani (ई पीक पाहणी) App Slow? या टिप्सने करा Registration जलद पूर्ण ई पीक पाहणी E-Pik Pahani (ई पीक पाहणी) App Slow? या टिप्सने करा Registration जलद पूर्ण

Pik Pahanai 2025-26: खरीप हंगामातील E-Pik Pahani (Digital Crop Survey) रजिस्ट्रेशनमध्ये सध्या server load खूप वाढल्याने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रत्यक्ष शेतात जाऊन Geo-Tagging करून crop photo upload करताना ॲप स्लो होणे, फोटो अपलोडला वेळ लागणे, latitude-longitude न मिळणे किंवा ॲप पुन्हा सुरू होणे अशा समस्या निर्माण होत आहेत.

ई पीक पाहणी नोंदणी 2025 — Server Overload

सध्या मोठ्या प्रमाणावर शेतकरी एकाच वेळी registration करण्याचा प्रयत्न करत असल्याने server speed कमी झाली आहे. त्यामुळे नोंदणी प्रक्रियेस अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागत आहे आणि काही शेतकऱ्यांना असे वाटते की app not working आहे.

Shasanachi सूचना – रात्री Registration करा.

शासनाने शेतकऱ्यांना काही सोप्या टिप्स दिल्या आहेत:

  1. रात्री चांगल्या network असलेल्या ठिकाणी (गावातील केंद्र किंवा शहरात) registration पूर्ण करा.
  2. सकाळी शेतात जाऊन offline crop survey करा.
  3. रात्री परत network चांगले असताना ‘Upload’ बटण दाबून data sync करा.

फायदे:

  • Server load कमी होईल.
  • वेळेचा अपव्यय टळेल.
  • Registration प्रक्रिया सहज पूर्ण होईल.

E-pik pahani last date लक्षात ठेवा.

  • E-Pik Pahani ची मुदत: १ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर 2025 (एकूण ४५ दिवस)
  • नवीन App Version: Google Play Store वर E-Pik Pahani v4.0.0 उपलब्ध आहे.

सध्याच्या अडचणी काय आहेत?

  • Geo-Tagging करताना location मिळण्यास वेळ लागणे.
  • Photo upload होताना delay.
  • App restart होणे.
  • Server connection issues.

शासनाने हे आवाहन केले आहे की, सर्व शेतकऱ्यांनी वेळेत नोंदणी करून crop data अपडेट करावे, जेणेकरून खरीप हंगामाची नोंद वेळेवर पूर्ण होईल.