EPik Pahani 2025|ई-पीक पाहणीबाबत महत्वाची अपडेट

खरीप हंगाम 2025 ची ई पीक पाहणी कधी करायची ? का करायची ?कशी करायची? याच्यामध्ये काय नवीन बदल करण्यात आलेले आहेत याच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आजच्या ब्लॉग च्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

केंद्र शासनाच्या Agristack अंतर्गत आता ई पीक पाहणी हा अतिशय महत्त्वाचा विषय झालेला आहे ,येत्या खरीप हंगामापासून 2025 पासून सुरू असलेल्या ई-पीक पाहणी डाऊनलोड करा DCS Application माध्यमातूनच ही पी पाहणी केली जाणार आहे .पीक विमा असेल किंवा कुठल्याही प्रकारच्या शासकीय योजनांचा लाभ असेल नुकसान भरपाय असतील किंवा इतर काही महत्त्वाच्या बाबी असतील पीक कर्ज असतील या सर्व आता या ई पक पाहणीच्या माध्यमातून लाभ दिल्या जाणार आहेत.

ई पीक पाहणी केल्यानंतर त्याचा डाटा agristack येणार आणि तो डाटा फार्मर आयडीला जुडल्यानंतर तुमचा फार्मर आयडी ज्या ज्या ठिकाणी वापरला जातो त्या त्या ठिकाणी तो डाटा घेतला जाणार उदाहरणार्थ. तुम्ही महाडीबीटीला एखाद्या योजनेचा अर्ज भरत असाल तर तुमच्या पिकांची माहिती ही agristack च्या त्या फार्मर आयडी सोबत येणार आहे अर्थी तुम्ही पक पाहणी केल्यानंतर तुमच्या पिकाची माहिती ऑटोमॅटिक महाडीबीटीच्या पोर्टलला सुद्धा दिसणार आहे.

EPik Pahani last date

ई-पीक पाहणी Epik Pahani app साहाय्याने सर्व शेतकऱ्यांनी स्वतःच्या मोबाईलद्वारे ७/१२ उताऱ्यावर शेतात लागवड केलेल्या खरीप पिकांची नोंदणी दिनांक 1 ऑगस्ट 2025 पासून सुरू होत आहे. महसूल विभागाचा ई-पीक पाहणी प्रकल्प दिनांक 15 ऑगस्ट 2021 पासून संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार या प्रकल्पात सुधारणा करून, रब्बी हंगाम 2024 पासून पीक पाहणी ही डिजिटल क्रॉप सर्वे प्रणालीद्वारे संपूर्ण राज्यात लागू करण्यात आली आहे.

सध्या खरीप हंगामातील पीक पाहणीची कार्यवाही सुरू आहे. खरीप हंगाम 2025 साठी ई-पीक पाहणी DCS मोबाईल अॅपचे व्हर्जन 4.0.0 अद्ययावत स्वरूपात गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी अॅप अपडेट करून घ्यावे.

खरीप हंगामातील शेतकरी स्तरावरील पीक पाहणी दिनांक 1 ऑगस्ट 2025 ते 14 सप्टेंबर 2025 या कालावधीत तर सहाय्यक स्तरावरील पीक पाहणी 15 सप्टेंबर 2025 ते 29 ऑक्टोबर 2025 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. तथापि, शेतकऱ्यांनी सहाय्यकांवर अवलंबून न राहता शक्य तितकी पीक पाहणी स्वतःच पूर्ण करावी. पीक पाहणी दरम्यान काही अडचणी आल्यास, आपल्या गावासाठी नेमणूक करण्यात आलेले पीक पाहणी सहाय्यक पहिल्या दिवसापासून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उपलब्ध असतील.

तरी सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी खरीप 2025 ची पीक पाहणी शासनाने दिलेल्या विहित मुदतीत पूर्ण करावी.

E pik pahani online Registration(ई-पीक पाहणी डाऊनलोड करा)

अश्या प्रकारे app open करा .

EPik Pahani 2025|ई-पीक पाहणीबाबत महत्वाची अपडेट

तुम्हाला तुमचा विभाग निवडायचा आहे.

EPik Pahani 2025|ई-पीक पाहणीबाबत महत्वाची अपडेट

तुम्हाला लॉगिन पद्धत निवडायची आहेत त्यासाठी तुम्हाला शेतकरी म्हणून लॉगिन करा वर क्लिक करायचे आहे.

EPik Pahani 2025|ई-पीक पाहणीबाबत महत्वाची अपडेट

मोबाईल ॲप मध्ये दिल्याप्रमाणे सगळी माहिती काळजी पूर्वक भरायची आहे .सर्व शेतकरी बांधवांनी याची नोंद घ्यायची आहे. तर ज्यांना कोणाची ईपीक पाहणी मागच्या वेळेस केली नसेल तर या वेळेस तुम्ही लवकरात लवकर तुम्ही ईपीक पाहणी सुरू झाल्यानंतर करून घ्या जेणेकरून भरपाईची रक्कम जे काही तुम्हाला मिळेल.