कामगारांसाठी आनंदाची बातमी! मोफत गृहउपयोगी भांडी मिळणार, अर्ज प्रक्रिया सुरू

भांडी वाटप योजना ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत बांधकाम कामगारांसाठी(गवंडी योजना) महाराष्ट्र शासनाकडून राबवण्यात येणारी भांडी वाटप योजना (Household Kit Scheme) पुन्हा सुरू झाली आहे. या योजनेत पात्र बांधकाम कामगारांना १७ प्रकारच्या गृहउपयोगी वस्तूंचा संच, एकूण ३० भांडी पूर्णपणे मोफत दिला जाणार आहे.

बांधकाम कामगार भांडी वाटप योजना अर्ज प्रक्रिया (Online Form Apply)

भांडी वाटप योजना (Gavandi kamgar yojana) ऑनलाइन नोंदणी अर्ज करण्यासाठी कामगारांकडे नोंदणी क्रमांक (Worker Registration Number) असणे आवश्यक आहे.
हा क्रमांक Mahabocw.in या संकेतस्थळावर लॉगिन करून आधार व मोबाईल नंबर टाकल्यावर मिळतो.
फॉर्म भरताना माहिती आपोआप (Auto-fill) येते; फक्त नोंदणी क्रमांक टाकणे आवश्यक आहे.
जवळचे कॅम्प/शिबिर निवडून अपॉईटमेंट बुक करावी लागते.
अपॉईटमेंटची तारीख निश्चित करून त्यादिवशी केंद्रावर उपस्थित राहावे लागते.

Construction Worker Registration Online (आवश्यक कागदपत्रे)

  • कामगार नोंदणी क्रमांक
  • आधार कार्ड
  • नोंदणीकृत मोबाईल नंबर
  • स्व-घोषणापत्र (Self Declaration Form) – डाउनलोड करून सहीसह अपलोड करणे आवश्यक

भांडी संचात काय मिळणार?

  • एकूण १७ प्रकारचे गृहउपयोगी साहित्य
  • ३० नग भांडी (स्टील, अॅल्युमिनियम व घरगुती वापरासाठी आवश्यक वस्तू)

बांधकाम कामगार योजना भांडी वाटप वितरण प्रक्रिया

  • अपॉईटमेंटच्या दिवशी निवडलेल्या केंद्रावर जावे.
  • तिथे बायोमेट्रिक व फोटो व्हेरिफिकेशन केले जाते.
  • सत्यापन पूर्ण झाल्यानंतर लगेच भांडी संच कामगारांना देण्यात येतो.

हेल्पलाइन

योजनेबाबत शंका असल्यास किंवा अपॉईटमेंट संदर्भातील अडचणीसाठी Maharashtra Building and Other Construction Workers Welfare Board (BOCW) च्या हेल्पलाइनवर संपर्क साधता येईल.