हवामान अंदाज :येत्या 48 तासात हवामान अंदाज


लाईव्ह हवामान अंदाज आजचा

आज (६ ऑगस्ट) : हवामान अंदाज पुणे वेधशाळा राज्यात सध्या पावसाने थोडी विश्रांती घेतली असून उकाडा आणि उन्हाचा चटका वाढत आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा भागांत विजांसह पावसाची शक्यता असून हवामान विभागाने यासाठी येलो अलर्ट दिला आहे.

राज्याच्या इतर भागांत ढगाळ वातावरण राहणार असून काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस होण्याची शक्यता आहे.

सध्या मॉन्सूनचे प्रवाह मंदावले आहेत. त्यामुळे अनेक भागांत पावसाने विश्रांती घेतली आहे. मंगळवारी (५ ऑगस्ट) सकाळपर्यंतच्या २४ तासांत फक्त काही ठिकाणीच हलक्या सरी कोसळल्या. पावसामुळे थोडा वेळ गारवा जाणवला असला, तरी उघडीनंतर पुन्हा उन्हाचा तडाखा आणि उकाडा वाढला आहे. चंद्रपूर येथे राज्यातील सर्वाधिक ३५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

आजचा हवामान अंदाज:

आज पावसाचा अलर्ट असलेले जिल्हे:

  • जोरदार पावसाची शक्यता: बीड, लातूर
  • विजांसह हलक्या सरींची शक्यता (येलो अलर्ट):
    पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, धाराशीव, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, गोंदिया, भंडारा, गडचिरोली

इतर भागांत आकाश ढगाळ राहणार असून उकाडा जाणवण्याची शक्यता आहे.