महाज्योतीकडून मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण 2025-26 | OBC, VJNT, SBC विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी

महाराष्ट्र शासनाच्या समान धोरणांतर्गत कार्यरत महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) मार्फत सन 2025-26 साठी मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी 20 ऑगस्ट 2025 पर्यंत www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावा, असे आवाहन महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत वावगे यांनी केले आहे.

महाज्योती योजना 2025 पात्रता

ही योजना खालील प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आहे:

  • इतर मागास वर्ग (OBC)
  • विमुक्त जाती – भटक्या जमाती (VJNT)
  • विशेष मागास प्रवर्ग (SBC)

महा ज्योती योजना कोणत्या प्रशिक्षणाचा समावेश आहे

महाज्योती मार्फत राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षांसाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे, ज्यामध्ये प्रमुखपणे समावेश आहे:

  • केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC)
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) – राज्यसेवा परीक्षा
  • संयुक्त गट ‘ब’ व ‘क’ परीक्षा

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) चे वैशिष्ट्ये

  • अनिवासी व ऑफलाइन प्रशिक्षणाची सुविधा.
  • ऑफलाइन प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा विद्यावेतन.
  • प्रशिक्षणाच्या प्रारंभी एकरकमी आकस्मिक निधी.
  • नामांकित संस्थांमार्फत उच्च दर्जाचे प्रशिक्षण.
  • प्रवेश परीक्षेद्वारे पात्र उमेदवारांची निवड.

अधिकृत संपर्क

फोन: 0712-2870120 / 121

वेबसाइट: www.mahajyoti.org.in

महत्त्वाच्या तारखा

  • महाज्योती योजना 2025 शेवटची तारीख : 20 ऑगस्ट 2025
  • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन (वेबसाइटवरून)

अतुल सावे, मंत्री, इतर मागास बहुजन कल्याण, म्हणाले –
“महाज्योतीने सामाजिक परिवर्तनाची चळवळ हाती घेतली आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविण्याची संधी मिळते. ही योजना केवळ प्रशिक्षणापुरती मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या भविष्यातील प्रगतीचा पाया आहे.”

जर तुम्ही OBC, VJNT किंवा SBC प्रवर्गातील विद्यार्थी असाल आणि UPSC, MPSC किंवा इतर राज्य व केंद्र सरकारच्या स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्याचे स्वप्न पाहत असाल, तर महाज्योतीचे मोफत प्रशिक्षण तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. विहित मुदतीत ऑनलाईन अर्ज करा आणि यशाच्या दिशेने पहिले पाऊल टाका.