Maharashtra Farmers Latest News
महाराष्ट्र राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. २०२२-२३ च्या कांदा अनुदान योजनेत फेरछाननीनंतर पात्र ठरलेल्या १४,६६१ शेतकऱ्यांना २८ कोटी ३२ लाख रुपयांचे अनुदान वितरित होणार आहे. विशेष म्हणजे, ज्यांच्या ७/१२ उताऱ्यावर कांदा पिकाची नोंद नव्हती अशा शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे.
कांदा अनुदान योजनेची माहिती
- प्रति क्विंटल ₹३५० अनुदान मिळणार
- जास्तीत जास्त २०० क्विंटल कांद्यापर्यंत फायदा
- कालावधी : १ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२३
- पात्र शेतकरी संख्या : १४,६६१
- मंजूर एकूण रक्कम : २८ कोटी ३२ लाख
जिल्हानिहाय अनुदान वितरण
नाशिक
- एकूण शेतकरी : ९,९८८
- अनुदान रक्कम : १८ कोटी ५८ लाख रुपये
धाराशिव
- शेतकरी : २७२
- अनुदान : १ कोटी २० लाख ९८ हजार
पुणे ग्रामीण
- शेतकरी : २७७
- अनुदान : ७८ लाख २४ हजार
सांगली
- शेतकरी : २२
- अनुदान : ८ लाख ७२ हजार
सातारा
- शेतकरी : २,०२
- अनुदान : ३ कोटी ३ लाख ८६ हजार
धुळे
- शेतकरी : ४३
- अनुदान : ५ लाख ७१ हजार
जळगाव
- शेतकरी : ३८७
- अनुदान : १ कोटी ६ लाख ४७ हजार
अहमदनगर (अहिल्यानगर)
- शेतकरी : १,४०७
- अनुदान : २ कोटी ८१ लाख
नागपूर
- शेतकरी : २
- अनुदान : २६ हजार
रायगड
- शेतकरी : २६१
- अनुदान : ६८ लाख ७६ हजार
शेतकऱ्यांसाठी दिलासा
या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषतः ७/१२ उताऱ्यावर नोंद नसल्याने आधी अपात्र ठरवलेले शेतकरी आता पात्र ठरले आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक ताण कमी होईल आणि कांदा उत्पादनाला प्रोत्साहन मिळेल.