“15 ते 17 ऑगस्टदरम्यान महाराष्ट्रातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालये बंद – जाणून घ्या कारण”


तांत्रिक देखभाल कामांसाठी नोंदणी बंद – 15 ते 17 ऑगस्टपर्यंत सर्व दुय्यम निबंधक कार्यालये बंद राहणार आहे .

12 ऑगस्ट 2025 – नोंदणी व मुद्रांक विभाग, महाराष्ट्र शासनाने जाहीर केले आहे की 15 ऑगस्ट 2025 ते 17 ऑगस्ट 2025 या कालावधीत तांत्रिक कामकाजामुळे सर्व दुय्यम निबंधक कार्यालयांमधील दस्त नोंदणी सेवा बंद राहणार आहे.

ही बंदी 14 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 12 वाजेपासून सुरू होऊन 17 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत लागू राहील. या काळात ऑनलाइन व ऑफलाइन दस्त नोंदणी सेवा उपलब्ध राहणार नाही.

संबंधित कार्यालयांनी व अधिकाऱ्यांनी ही सूचना नागरिकांपर्यंत पोहोचवावी, तसेच आवश्यक ती उपाययोजना करावी असेही आदेश देण्यात आले आहेत.

महत्वाचे मुद्दे

  • बंदी कालावधी किती दिवस आहे : 15 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट 2025 पर्यंत बंद राहणार आहे .
  • कारण काय आहे: तांत्रिक देखभाल व सुधारणा कार्य या साठी बंद ठेवले आहे .
  • प्रभाव कशावर होणार : सर्व दुय्यम निबंधक कार्यालयांतील दस्त नोंदणी सेवा बंद राहणार आहे .