MGnrega Job Card (नवीन जॉब कार्ड ऑनलाइन अर्ज करा)

जॉब कार्ड कसे काढावे?(Job Card Kase Kadhave)

जॉब कार्ड कसं काढावं? आता घरकुल योजनेचे फॉर्म सुरू आहेत त्यासाठी सुद्धा जॉब कार्ड लागतय किंवा अन्य कोणत्या योजना भविष्यात येतील त्यासाठी तुम्हाला जॉब कार्ड सुद्धा लागू शकतो आणि आता जर पाहिलं घरकुल योजनेसाठी इथे जॉब कार्डचा नंबर मागितला जातोय आणि त्यासाठीच तुम्हाला जॉब कार्ड काढावं लागणार आहे आज आपण या ब्लॉग मध्ये जॉब कार्ड कसं काढायचं असतं जॉब कार्ड साठी कोणकोणती कागदपत्रे लागतात आणि जर तुमचा अगोदर जॉब कार्ड असेल ते कशा पद्धतीने डाऊनलोड करायचं या मध्ये पाहणार आहे.
ब्लॉग नक्की शेवटपर्यंत पहा वेबसाईट पहिल्यांदा आला असाल तर वेबसाईट सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्वपूर्ण ब्लॉग तुम्हाला मिळत राहतील . तर चला मित्रांनो  सुरू करूयात.  तर मित्रांनो तुमचा पहिला प्रश्न म्हणजे जॉब कार्ड कसं काढावं जॉब कार्ड ऑनलाईन निघत का? भरपूर जण विचारतात तर मित्रांनो लक्षात ठेवा जॉब कार्ड हे ऑनलाईन निघत नाही.

महात्मा गांधी नरेगा जॉब कार्ड कोण काढून देतो ?

जॉब कार्ड हे ग्राम रोजगार सेवक काढून देतो किंवा तुम्ही ग्रामसेवकाकडे जाऊन जॉब कार्ड काढू शकता, तर त्यासाठी तुम्हाला एक फॉर्म जो आहे तो भरून द्यावा लागतो आणि त्यासोबत तुम्हाला कागदपत्रे जोडावी लागतात आणि जो जॉब कार्डचा फॉर्म आहे तो फॉर्म नमुना १ . म्हणतात हा जॉब कार्डचा फॉर्म यात जॉब कार्ड मध्ये तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती भरायची असते पेनाने आणि त्यामध्ये तुमची सगळी माहिती भरल्यानंतर तुम्हाला त्यासोबत कागदपत्रे जोडायची आणि जो तुमच्या गावातील ग्रामसेवक आहे त्यांच्याकडे जाऊन तुम्ही ते अर्ज जमा करायचा आणि त्यानंतर तुमचा जॉब कार्ड लगेच सुद्धा मिळू शकतो ग्राम रोजगार सेवक जो असेल त्यांच्याकडे सुद्धा तुम्ही विनंती करून जॉब कार्डचा नंबर लगेच सुद्धा मिळवू शकता किंवा काही एक पाच ते 10 दिवसांनी सुद्धा तुम्हाला जॉब कार्डचा नंबर भेटून जाईल जो फॉर्म भरून द्यायचा आहे तो तुम्हाला Pdf न मध्ये दिलेला आहे .

त्याची पीडीएफ काढा आणि तो प्रिंट काढून त्याच्यावर सगळी माहिती भरा आणि कागदपत्रे जोडायची आहेत.

Eligibility for job Card(कोणकोणती कागदपत्रे जोडायची आहेत )

कोणकोणती कागदपत्रे जोडायची आहेत मित्रांनो कागदपत्रांमध्ये जर पाहिलं तर जो फॉर्म आहे तो सर्वात पहिला तुम्हाला नमुना एक आहे तो तुम्हाला भरायचा आहे. त्याच्यासोबत

  • तुम्हाला आधार कार्ड द्यायचे आहेत
  • सगळ्यांचे 18+ जे काही घरातील व्यक्ती आहेत . त्या सर्वांचे आधार कार्ड तुम्हाला द्यायचे आहेत.
  • रेशन कार्ड सुद्धा तुम्हाला जोडायचा आहे.
  •  बँक पासबुकची झेरॉक्स सुद्धा तुम्हाला जोडायची आहे .
  • जो काही फॅमिलीचा एक फोटो काढायचा आहे जो 4/6 या पिक्सेल मध्ये असला पाहिजे .

ही सर्व कागदपत्रे तुम्हाला फॉर्म नमुना एक सोबत जोडायची आणि हा अर्ज तुमच्या ग्रामपंचायत ग्रामसेवकाकडे द्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला जॉब कार्ड हे मिळणार आहे.

How to download job card?( तुमच्या गावाची जॉब कार्ड यादी कशी पहावी)

तुमचे अगोदर जर जॉब कार्ड असेल तर तुम्हाला ते पाहता येईल आणि ते डाऊनलोड करता सुद्धा येईल आता ते डाऊनलोड कसं करायचं मित्रांनो जॉब कार्ड तुम्हाला डाऊनलोड करण्यासाठी डायरेक्ट लिंक आहे ती ब्लॉग मध्ये दिली आहे त्यावरती क्लिक करायच आहे इथे तुम्ही येणार आहात

Job card download – https://nregastrep.nic.in/netnrega/ho…

  • इथे आल्यानंतर जो काही आपला जिल्हा असेल तो आपला इथे जिल्हा तुम्हाला निवडायचा आहे.
  • आपल्याला ब्लॉक विचारला जाईल ब्लॉक म्हणजेच तुमचा जो काही तालुका असेल तो तालुका इथे तुम्हाला निवडायचा आहे.
  • ग्रामपंचायत दाखवले जातील तर इथे थोडं झूम करून तुम्ही तुमची जी काही ग्रामपंचायत असेल ती ग्रामपंचायत तुम्हाला इथे निवडायची आहे ग्रामपंचायत निवडल्यानंतर त्यानंतर
  • आपल्याला विचारला जाईल जॉब कार्ड रिलेटेड रिपोर्ट्स इथे दाखवले तर इथे पहा तीन नंबरचा ऑप्शन तुम्हाला देण्यात आलेला आहे जॉब कार्ड एम्प्लॉयमेंट रजिस्टर इथे पहा याच ऑप्शन वरती आपल्याला क्लिक करायचा आहे .
  • इथे पहा हा जो ऑप्शन आहे तीन नंबरचा जॉब कार्ड एम्प्लॉयमेंट रजिस्टर याच ऑप्शन वरती आपल्याला क्लिक करायच आहे क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता तुमच्या गावातील ग्रामपंचायत मधील सर्व जॉब जॉब कार्ड इथे दाखवले जातील.
  • हे जॉब कार्ड तुम्हाला डाऊनलोड करण्यासाठी फक्त जॉब कार्ड जो नंबर आहे त्या नंबर वरती इथे क्लिक करायचं आहे आणि इथे नाव पण आहे इथे नंबर वरती जस तुम्ही क्लिक कराल तर इथे तुमच जॉब कार्ड जे आहे ते इथे येणार आहे आणि हे तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता आणि डाऊनलोड करून सुद्धा ठेवू शकता .

तर अशापद्धतीने तुम्ही जॉब कार्ड तुमचं काढलेला आहे का नाही ते पाहू शकता आणि जॉब कार्ड जर काढल असेल तर ते डाऊनलोड करू शकता महत्त्वपूर्ण ब्लॉग होता आपल्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद