Affordable housing Maharashtra:कोकण मंडळाच्या घरांना विक्रीभावी पडून राहत असल्याच्या चर्चा सुरू असतानाच, यंदाच्या म्हाडा कोकण मंडळाच्या लॉटरीला तुफान प्रतिसाद मिळत आहे. सोमवार (११ ऑगस्ट) सायंकाळी ६:४५ वाजेपर्यंत ५,२८५ घरे आणि ७७ भूखंडांच्या विक्रीसाठी तब्बल ६७,५३९ अर्ज दाखल झाले आहेत. यापैकी ४०,९९८ अर्जदारांनी अनामत रक्कमेचा भरणा पूर्ण केला आहे .
MHADA Konkan Board Housing Scheme
म्हाडा लॉटरी 2025 मुंबई जाहिरात कोणत्या ठिकाणांसाठी घरे?
कोकण मंडळ गृहनिर्माण योजना
या लॉटरीमध्ये ठाणे, डोंबिवली, कल्याण, टिटवाळा, नवी मुंबई, वसई, पालघर, मिरारोड, कावेसार, बाळकुम, शिरढोण आणि गोठेघर या ठिकाणांतील घरांचा समावेश आहे. ठाणे आणि नवी मुंबईतील घरांकडे अर्जदारांचा अधिक ओढा असल्याचे म्हाडा सूत्रांनी सांगितले.
Mhada Lottery 2025 Mumbai Application Form Online Date महत्वाच्या तारखा
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: १३ ऑगस्ट २०२५, रात्री ११:५९(MHADA application last date)
- अनामत रकमेचा भरणा: १४ ऑगस्ट २०२५, रात्री ११:५९ पर्यंत ऑनलाइन
- प्रारूप यादी प्रसिद्धी: २१ ऑगस्ट २०२५, सायं. ६ वाजता
- दावे व हरकती नोंदविण्याची मुदत: २५ ऑगस्ट २०२५, सायं. ६ वाजेपर्यंत
- अंतिम यादी प्रसिद्धी: १ सप्टेंबर २०२५, सायं. ६ वाजता
- लॉटरी सोडत: ३ सप्टेंबर २०२५, सकाळी १० वाजता, डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे
परवडणारी घरे महाराष्ट्र
- २०% सर्वसमावेशक योजना: ५६५ घरे
- १५% एकात्मिक शहर गृहनिर्माण योजना: ३,००२ घरे
- कोकण मंडळ गृहनिर्माण योजना व विखुरलेल्या सदनिका: १,६७७ घरे
- कोकण मंडळ गृहनिर्माण योजना (५०% परवडणाऱ्या सदनिका): ४१ घरे
मुदतवाढीबाबत संभ्रम
लॉटरीला मिळालेल्या चांगल्या प्रतिसादामुळे अर्ज प्रक्रियेला १५ दिवसांची मुदतवाढ मिळाल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी यांनी याबाबत स्पष्ट केले की, अद्याप कोणतीही मुदतवाढ देण्यात आलेली नाही.