Namo Shetkari Yojana: नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता कधी येणार ? तपासा ऑनलाइन

महाराष्ट्र शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना सातवा हप्ता वितरित होणार आहे. हा हप्ता 9 ते 10 सप्टेंबर 2025 दरम्यान लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. राज्य शासनाने यासाठी तब्बल 2932 कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नमो शेतकरी योजना स्टेटस?

शेतकऱ्यांना आपला FTO (Fund Transfer Order) जनरेट झाला आहे का हे तपासणे महत्त्वाचे आहे. जर FTO जनरेट झाला असेल तर हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे.

नमो शेतकरी हप्ता स्टेप प्रक्रिया –

  1. नमो शेतकरी महासन्मान निधी पोर्टलवर जा
    👉https://nsmny.mahait.org/
  2. Beneficiary Status या पर्यायावर क्लिक करा.
  3. तुमचा नोंदणी क्रमांक / मोबाईल नंबर / आधार नंबर टाका.
  4. कॅप्चा कोड भरून Get Aadhaar OTP वर क्लिक करा.
  5. OTP टाकून व्हेरिफाय केल्यानंतर तुमची संपूर्ण माहिती दिसेल.

नमो शेतकरी योजना 2025 FTO तपासण्यासाठी दुसरी पद्धत – PFMS Portal

जर तुम्हाला खात्री करून घ्यायची असेल की हप्ता प्रत्यक्षात जमा होणार का, तर तुम्ही PFMS (pfms.nic.in) पोर्टलवर जाऊन तपासू शकता.

  1. DBT Status Tracker वर क्लिक करा.
  2. कॅटेगरी मध्ये DBT NSMNFY Portal निवडा.
  3. तुमचा Application Number टाका (हा नंबर NSMNFY पोर्टल किंवा PM Kisan पोर्टलवर दिसतो).
  4. कॅप्चा भरून Search वर क्लिक करा.
  5. इथे तुम्हाला FTO जनरेट झाला आहे का आणि पेमेंट स्टेटस काय आहे हे दिसेल.

नमो शेतकरी हप्ता कधी मिळणार ?(Namo Shetkari Yojana 7th Installment Date)

  • 6 सप्टेंबर 2025 पासून संध्याकाळी 5 नंतर अनेक शेतकऱ्यांचे FTO जनरेट झालेले आहेत.
  • ज्यांचा FTO जनरेट झाला आहे त्यांचा हप्ता 9 किंवा 10 सप्टेंबरला खात्यात जमा होणार आहे.
  • जर FTO जनरेट नसेल, तर कदाचित हप्ता थांबू शकतो किंवा अपात्रतेमुळे थेट नाकारला जाऊ शकतो.
  • शासनाकडून सध्या 92 लाख 36 हजार लाभार्थ्यांना हप्त्यांचे वितरण सुरू आहे.

नमो शेतकरी

शेतकऱ्यांनी आपला FTO स्टेटस NSMNFY पोर्टल किंवा PFMS पोर्टल वर वेळोवेळी तपासावा. जर तुम्ही पात्र असाल तर तुमचा सातवा हप्ता लवकरच खात्यात जमा होईल.

👉 अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या: pfms.nic.in