मतदान कार्ड (Voter ID Card) हे भारतीय नागरिकांसाठी केवळ मतदानाचा अधिकार वापरण्यासाठीच नव्हे तर एक महत्त्वपूर्ण ओळखपत्र देखील आहे. जर तुम्ही 18 वर्षांचे पूर्ण झालात आणि तुमचं नाव मतदार यादीत नसेल तर तुम्ही सहजपणे ऑनलाइन नवीन मतदान कार्ड मिळवू शकता. या आर्टिकलमध्ये आपण Voter ID Online Apply 2025 ची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
मतदान कार्ड काढण्यासाठी आवश्यक वेबसाईट
नवीन मतदार नोंदणीसाठी तुम्हाला https://voters.eci.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
👉 येथे Sign Up करून खाते तयार करा.
👉 मोबाइल नंबर टाकून OTP द्वारे खाते सुरू करा.
Step by Step प्रक्रिया – नवीन मतदान कार्डसाठी अर्ज ( मतदान कार्ड कसे काढावे)
1. खाते तयार करा (Sign Up)
- मोबाइल नंबर टाका
- OTP द्वारे व्हेरिफाय करा
- नाव, आडनाव भरून Account Create करा
2. लॉगिन करा
- मोबाइल नंबर आणि OTP वापरून Login करा
- आता डॅशबोर्डवर “New Voter Registration (Form 6)” निवडा
3. फॉर्म 6 भरताना आवश्यक माहिती
- State & District निवडा
- मतदारसंघ (Constituency) निवडा
- वैयक्तिक माहिती (नाव, वडिलांचे नाव, आडनाव) टाका
- पासपोर्ट साईझ फोटो (2MB च्या आत) अपलोड करा
4. कुटुंबातील सदस्याची माहिती
- वडील/आई/पती/पत्नी यापैकी एकाचे नाव द्या
5. संपर्क माहिती
- मोबाइल नंबर अनिवार्य
- ईमेल ऑप्शनल
6. आधार माहिती (Mandatory)
- आधार क्रमांक द्या
- E-Sign पद्धतीने आधार OTP द्वारे सबमिट करा
7. जन्मतारीख व पुरावे (Age Proof)
- जन्मतारीख भरा
- पुरावा म्हणून आधार कार्ड, पासपोर्ट, पॅन कार्ड, मार्कशीट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स अपलोड करा
8. पत्ता माहिती व पुरावे (Address Proof)
- पूर्ण पत्ता टाका
- पुरावा म्हणून आधार कार्ड, बँक पासबुक, वीजबिल, सातबारा अपलोड करा
9. डिक्लेरेशन आणि सबमिट
- माहिती बरोबर असल्याची खात्री करा
- कॅप्चा टाका
- “Preview & Submit” वर क्लिक करा
- शेवटी E-Sign & Submit करा
अर्ज केल्यानंतर काय मिळेल?
- सबमिट केल्यानंतर तुम्हाला Acknowledgement Slip आणि Reference Number मिळेल
- हा नंबर जपून ठेवा कारण त्याद्वारे तुम्ही स्टेटस पाहू शकता
अर्जाची स्थिती (Track Application Status)
- वेबसाईटवर “Track Application Status” या पर्यायावर क्लिक करा
- Reference Number टाकून तपासा
- Status ‘Submitted → Verified → Approved’ असे दिसेल
मतदान कार्ड डाउनलोड कसे करावे?(मतदान कार्ड डाउनलोड महाराष्ट्र)
- अर्ज मंजूर झाल्यावर तुम्ही EPIC Download पर्याय वापरून मतदान कार्ड डाउनलोड करू शकता
- यासाठी Reference Number व OTP आवश्यक असेल
- हार्ड कॉपी पोस्टाने घरी पाठवली जाईल (6 महिन्यात)
मतदान कार्ड काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे (Documents Required for Voter ID 2025)
- आधार कार्ड (अनिवार्य)
- वयाचा पुरावा – जन्म दाखला / मार्कशीट / पासपोर्ट
- पत्त्याचा पुरावा – आधार, पासबुक, वीजबिल, सातबारा
महत्वाच्या टिप्स
✔ अर्ज करताना माहिती नीट तपासा
✔ फोटो स्पष्ट आणि 2 MB च्या आत असावा
✔ आधार कार्ड लिंक मोबाइल नंबरवर OTP येईल
✔ अर्जाचा रेफरन्स नंबर नक्की सेव्ह करा.
नवीन मतदान कार्ड काढण्यासाठी आता E-Sign आधार OTP पद्धत सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे प्रक्रिया अधिक सोपी आणि सुरक्षित झाली आहे. वय 18 पूर्ण झालेल्या प्रत्येक नागरिकाने आपलं नाव मतदार यादीत नक्की लावलं पाहिजे.
👉 आजच voters.eci.gov.in वर जाऊन अर्ज करा आणि मतदानाचा हक्क बजवा.
FAQ – नवीन मतदान कार्ड ऑनलाइन अर्ज 2025
1. नवीन मतदान कार्डसाठी ऑनलाइन अर्ज कुठे करायचा?
👉 नवीन मतदान कार्डसाठी तुम्हाला https://voters.eci.gov.in या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करावा लागतो.
2. Voter ID अर्जासाठी कोणते कागदपत्र आवश्यक आहेत?
- आधार कार्ड (अनिवार्य)
- वयाचा पुरावा – जन्म दाखला / मार्कशीट / पासपोर्ट
- पत्त्याचा पुरावा – आधार, बँक पासबुक, वीजबिल, सातबारा
3. मतदान कार्ड मिळायला किती दिवस लागतात?
👉 अर्ज मंजूर झाल्यानंतर साधारण 2 ते 6 महिन्यांच्या आत मतदान कार्ड पोस्टाने तुमच्या पत्त्यावर पाठवले जाते.
4. अर्जाची स्थिती (Status) कशी तपासायची?
👉 voters.eci.gov.in वर “Track Application Status” या पर्यायावर Reference Number टाकून स्टेटस तपासता येते.
5. ई-मतदान कार्ड (EPIC) कसे डाउनलोड करायचे?
👉 अर्ज मंजूर झाल्यावर वेबसाईटवर “EPIC Download” पर्यायातून Reference Number टाकून आणि OTP द्वारे मतदान कार्ड PDF स्वरूपात डाउनलोड करता येते.