“७/१२ मधील पोटखराब क्षेत्र वाहितीलायक करण्याची प्रक्रिया | Satbara Correction 2025”

महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची माहिती! आपल्या ७/१२ (सातबारा उताऱ्यावर) दाखवलेले पोटखराब क्षेत्र आता वाहितीलायक (लागवडीयोग्य) करून घेता येणार आहे. या प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांना अनुदान, पीककर्ज, व इतर शासकीय योजनांचा लाभ मिळणे सोपे होईल.

काय आहे पोटखराब क्षेत्र?

सातबाऱ्यावर जे क्षेत्र लागवडीस अयोग्य दाखवलेले असते, त्याला पोटखराब क्षेत्र म्हटले जाते. अशा जमिनीवर शेतकऱ्यांना अनेक शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही.

उदा. – जर एखाद्या शेतकऱ्याच्या नावावर १.२० हेक्टर  वाहितीलायक क्षेत्र असून त्यासोबत ०.३० आर पोटखराब क्षेत्र असेल, तर अर्ज करून हे क्षेत्रही  वाहितीलायक करून घेता येते. परिणामी एकूण क्षेत्र १.५० हेक्टर नोंदवले जाते.

प्रक्रिया कशी आहे?

  1. अर्ज सादर करणे
    • तहसीलदार किंवा स्थानिक तलाठी यांच्या नावे अर्ज द्यावा.
    • अर्जासोबत आपला सातबारा जोडावा.
  2. तलाठी अहवाल तयार करतो
    • तलाठी किंवा मंडळ अधिकारी प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी करतात.
    • क्षेत्राचा पंचनामा, नकाशा तयार केला जातो.
    • खातेदारास नोटीस बजावली जाते.
  3. मोजणी विभागाची तपासणी
    • भूमी अभिलेख विभाग क्षेत्राचे वर्गीकरण (वर्ग अ / वर्ग ब) तपासतो.
    • वर्ग अ असल्यास क्षेत्र वैतीलायक केले जाते.
    • वर्ग ब (नदी, नाला, कायमचा कालवा) असल्यास ते वैतीलायक करता येत नाही.
  4. प्रांताधिकारी यांचा अंतिम आदेश
    • तहसीलदार अहवाल प्रांताधिकारींकडे पाठवतात.
    • आदेश आल्यानंतर तलाठी सातबाऱ्यावर नोंद बदल करतो.

शेतकऱ्यांना होणारे फायदे

  • एकूण क्षेत्र वाढल्यामुळे पीक कर्ज मंजुरी सोपी होते.
  • अनुदान, अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळवणे सोपे होते.
  • शेतकऱ्यांना लागवडीयोग्य क्षेत्रावर हक्क प्राप्त होतो.

त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपले पोटखराब क्षेत्र  वाहितीलायक करून घेण्यासाठी लवकरात लवकर तहसील कार्यालयात अर्ज करावा.


वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

Q1: पोटखराब क्षेत्र म्हणजे काय?

उत्तर: सातबाऱ्यावर लागवडीस अयोग्य दाखवलेले क्षेत्र म्हणजे पोटखराब क्षेत्र. या क्षेत्रावर शेतकऱ्यांना पीककर्ज किंवा शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही.

Q2: पोटखराब क्षेत्र वाहितीलायक का करावे?

उत्तर: पोटखराब क्षेत्र वाहितीलायक केल्यास एकूण जमीन वाढते आणि शेतकऱ्यांना कर्ज, अनुदान व शासकीय योजनांचा लाभ मिळतो.

Q3: पोटखराब क्षेत्र वाहितीलायक करण्यासाठी अर्ज कोठे करायचा?

उत्तर: अर्ज तहसीलदार किंवा स्थानिक तलाठी यांच्याकडे करावा.

Q4: अर्जासोबत कोणती कागदपत्रे लागतात?

उत्तर:

  • पोटखराब क्षेत्र वाहितीलायक करण्यासाठी अर्ज
  • सातबारा उतारा

Q5: पोटखराब क्षेत्र वाहितीलायक कोणते केले जाते?

उत्तर: वर्ग A क्षेत्र (जे प्रत्यक्ष लागवडीस योग्य आहे) वाहितीलायक केले जाते. वर्ग B क्षेत्र (नदी, नाला, कालवा) कायम पोटखराब राहते.

Q6: अंतिम निर्णय कोण घेतो?

उत्तर: सर्व अहवाल तपासून प्रांताधिकारी अंतिम आदेश काढतात आणि त्यानंतर तलाठी सातबाऱ्यावर नोंद करतात.