Pradhan Mantri Suraksha Bima Yojana | “थकीत पीकविमा भरपाईचा महासागर सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यात; दोन वर्षांची प्रतीक्षा संपणार!”

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दीर्घकाळापासून थकीत असलेली पीकविमा भरपाई अखेर सोमवारी (११ ऑगस्ट) थेट बँक खात्यात जमा होणार आहे. केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते राजस्थानातील झुंझुनू येथे विशेष कार्यक्रमात या रकमेचा वितरण सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमाला राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा देखील उपस्थित राहिले होते .शिवराजसिंह चौहान यांनी बोलताना स्पष्ट केले आहे .

काय आहे प्रकरण?

राज्यातील अनेक शेतकऱ्यांना खरीप २०२२ पासून ते रब्बी २०२४-२५ पर्यंतच्या वेगवेगळ्या हंगामातील विमा भरपाई अद्याप मिळालेली नव्हती. खरिप २०२४ मधील काही टप्प्यांवर — काढणीनंतरचे मूल्यांकन, पीक कापणी प्रयोग इत्यादी — आधारित भरपाईही थकलेली होती.
राज्य व केंद्र सरकारने विमा कंपन्यांना हप्ता आणि अनुदान देऊनही भरपाई अडून राहिल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी होती.

थकबाकीची कारणे

  • राज्य सरकारकडून हिस्स्याचा विमा हप्ता वेळेवर न मिळाल्याने विमा कंपन्यांनी जुलैपर्यंत भरपाई थांबवली.
  • जुलैमध्ये हप्ता मिळाल्यानंतरही कंपन्यांनी विलंब केला.
  • काही कंपन्यांनी मंजुरी, दाव्याची प्रक्रिया आणि डिजिटल स्वाक्षरी लांबवली.

केंद्र सरकारची थेट हस्तक्षेप

शेतकऱ्यांचा रोष आणि आंदोलने लक्षात घेऊन केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी स्वतः पुढाकार घेतला.
११ ऑगस्ट रोजी एका क्लिकवर

  • मंजूर रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल.
  • विमा कंपन्यांना सर्व प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचे आदेश दिले गेले आहेत .
  • राज्य सरकारांना हिस्स्याचा हप्ता वेळेवर देण्याची सक्त सूचना दिले गेले आहे .

शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा

या निर्णयामुळे हजारो शेतकऱ्यांना महिन्यांपासून अडकलेली रक्कम मिळणार आहे. खरीप आणि रब्बी हंगामातील भरपाई एकाचवेळी जमा झाल्याने आर्थिक दिलासा मिळेल आणि पुढील हंगामासाठी नियोजन सोपे होईल.