“मोठी आनंदाची बातमी! संजय गांधी व श्रावण बाळ योजनेत 2500 रुपये”

मुंबई | 15 सप्टेंबर 2025
महाराष्ट्र शासनाने दिव्यांग लाभार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजनाश्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणारे मासिक अर्जसहाय्य 1500 रुपयांवरून वाढवून 2500 रुपये करण्यात आले आहे. हा निर्णय ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार आहे.

दिव्यांगांसाठी मोठा दिलासा

राज्यातील लोकप्रतिनिधी, विविध दिव्यांग संघटना आणि स्वयंसेवी संस्थांकडून अनेक वर्षांपासून या वाढीची मागणी होत होती. शेवटी शासनाने यावर निर्णय घेऊन दिव्यांगांना दिलासा दिला आहे.

कोणाला मिळणार वाढीव लाभ?

👉 संजय गांधी निराधार अनुदान योजना
👉 श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना
👉 इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना
👉 इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना
👉 इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना

वरील सर्व योजनांमधील पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना वाढीव अर्जसहाय्य लागू राहील.

थेट खात्यात जमा

नवीन वाढीव अर्जसहाय्य DBT (Direct Benefit Transfer) पोर्टलद्वारे थेट आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे. यामुळे पारदर्शकता आणि वेळेत लाभ मिळेल.

अधिकृत माहिती कुठे मिळेल?

हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर www.maharashtra.gov.in उपलब्ध आहे .