महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी “शेतासाठी तार कुंपण योजना” सुरू केली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना 90% पर्यंत अनुदान मिळणार असून शेतातील पिकांचे संरक्षण करण्यासाठी ही योजना खूप उपयोगी ठरणार आहे.
योजनेचे फायदे
- पिकांचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण होऊन उत्पादन वाढते.
- शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान कमी होते.
- तार कुंपणामुळे जनावरे व चोरट्यांपासून पिके सुरक्षित राहतात.
- चांगल्या उत्पादनामुळे शेतकऱ्यांचा उत्पन्नात वाढ होते.
आवश्यक कागदपत्रे
योजनेसाठी अर्ज करताना खालील कागदपत्रांची आवश्यकता आहे:
- शेतकरी ओळख क्रमांक (महाडीबीटीसाठी)
- जात प्रमाणपत्र
- बँक पासबुक
- ग्रामपंचायतीचा दाखला समितीचा ठराव
- जमीन मालकी हक्क अथवा भाडेतत्त्वावरील करारपत्र
- वन अधिकाराचा दाखला (जर लागू असेल)
- स्वघोषणापत्र
पात्रता व अटी
- अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
- शेत जमीन मालकी हक्काची किंवा भाडेतत्त्वावर असणे आवश्यक.
- अतिक्रमणमुक्त जमीन असावी.
- पिकांचे नुकसान होणाऱ्या भागातील शेतकऱ्यांना प्राधान्य.
- अर्ज करताना ग्रामविकास समिती/संयुक्त वन समितीची संमती आवश्यक.