हवामान अंदाज(Weather Today)”१२ ऑगस्टपासून पावसाचा जोर वाढणार! हवामान विभागाचा इशारा”

हवामान अंदाज पुणे वेधशाळा आज | १० ऑगस्ट २०२५ —महाराष्ट्रात सध्या हवेचा दाब आणि वातावरणातील बदल पावसाच्या शक्यतेकडे इशारा करत आहेत. हवामान विभागाच्या माहितीनुसार, आज (ता. १०) राज्याच्या उत्तरेकडील भागात 1004 हेप्टापास्कल तर मध्य महाराष्ट्रात 1006 हेप्टापास्कल हवेचा दाब नोंदवला गेला आहे. यामुळे काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी कोसळू शकतात.

येत्या 48 तासात हवामान अंदाज

  • ११ ऑगस्ट: हवेचा दाब 1006 hPa, हलक्या पावसाची शक्यता.
  • १२ ऑगस्ट: उत्तरेस 1002 hPa, मध्य महाराष्ट्रात 1004 hPa, मध्यम पावसाची शक्यता.
  • १३ ऑगस्ट: हवेचा दाब 1004 hPa, हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो .
  • १४ ऑगस्टपासून: हवेच्या दाबात थोडी वाढ, हलक्या पावसाच्या सरी पडू शक्यता.

बंगालच्या उपसागरातून बदलाची चाहूल

हवामान तज्ज्ञांच्या मते, मंगळवार (ता. १२) पासून बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भागात ढग दाटून चांगल्या पावसाची शक्यता आहे.

हवामान अंदाज महाराष्ट्र | पावसातील कमतरता चिंताजनक

१ जून ते ६ ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे:

सातारा (-26%), नांदेड (-22%), वाशीम (-21%), धुळे (-18%), यवतमाळ (-14%), नंदुरबार (-10%)

बीड (-48%), सोलापूर (-41%), हिंगोली (-41%), अहिल्यानगर (-34%)

लातूर (-28%), अकोला (-28%), जळगाव (-28%), अमरावती (-31%)

प्रशांत महासागरातील पेरु आणि इक्वाडोरजवळ पाण्याचे तापमान अनुक्रमे १६°C आणि २१°C इतके कमी झाल्याने हवेचा दाब वाढला आहे. यामुळे वाऱ्यांचे प्रवाह बदलले असून, पुढील काही दिवसांत महाराष्ट्रात पावसाची संधी अधिक वाढणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.